Buldhana News : अचानक वाहनांवर दगड पडू लागले, प्रवासी घाबरले; राष्ट्रीय महामार्ग 6 वरील वाहतुक तीन तास खाेळंबली

खामगाव पोलिस घटनेचा तपास करत आहेत.
Buldhana Crime News, Khamgoan NH-6
Buldhana Crime News, Khamgoan NH-6saam tv

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहर नजीकच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर मध्यरात्री अज्ञात समाजकंटकांनी धुमाकूळ घातला. राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या अनेक वाहनांवर तुफान दगडफेक केली. यामुळे महामार्गावरील वाहतुक तब्बल तीन तास खाेळंबली हाेती.  (Maharashtra News)

Buldhana Crime News, Khamgoan NH-6
AAP Swarajya Yatra : खोके सरकार लोकशाहीला घातक : प्रीती मेनन

खामगाव शहरा जवळ असणा-या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर मध्यरात्री काही जणांनी वाहनांवर तुफान दगडफेक केली. या दगडफेकीत खाजगी लक्झरी बस , कार , ट्रक अशा ८ ते १० वाहनांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. अचानक घडलेल्या घटनेमुळे वाहनधारक भयभीत झाले. काहींनी घटनेची माहिती पाेलिसांना कळवली. पोलिस घटनास्थळी पाेहचल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.

Buldhana Crime News, Khamgoan NH-6
Shivrajyabhishek Sohala : राष्ट्रवादी संपुर्ण महाराष्ट्रात साजरा करणार शिवराज्याभिषेक साेहळा : जयंत पाटील (पाहा व्हिडिओ)

दरम्यान ही दगडफेक कुणी केली, का केली हे समजू शकले नाही. काेणाचा लूटीचा प्रयत्न हाेता की आणखी काही याचा तपास खामगाव पोलिस करत आहेत. तूर्तास अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहन धारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com