Latur News: वॉटर ग्रीडमधून ३८ गावांची भागणार तहान; ४८१ कोटींच्या योजना प्रकल्पाला वेग

वॉटर ग्रीड योजनेच्या माध्यमातून जळकोट तालुक्यातील ३८ गावांत मुबलक प्रमाणात शुद्ध पाणीपुरवठा केला जाणार आहे.
Latur News
Latur NewsSaam tv

दीपक क्षिरसागर

Latur News: वॉटर ग्रीड योजनेच्या माध्यमातून जळकोट तालुक्यातील ३८ गावांत मुबलक प्रमाणात शुद्ध पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यासाठीच्या ४८१ कोटींच्या कामांच्या हालचालींना वेग आला आहे. त्यासाठी येथे कार्यालयही सुरू करण्यात आले आहे, तसेच जलशुद्धीकरण केंद्राची जागाही जवळपास निश्चित करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

वॉटर ग्रीडअंतर्गत जळकोट आणि उदगीर तालुक्यात जवळपास १२९ गावे आहेत. त्यात जळकोटमधील ३८ तर उदगीर तालुक्यातील ९१ गावे आहेत. जळकोट- वांजरवाडाच्या मध्यभागी जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार असून, तिथे दोन संतुलित जलकुंभही उभारण्यात येणार आहेत. जळकोट तालुक्यात पाच तर उदगीरात सात जलकुंभ उभारले जाणार आहेत. कंधार तालुक्यातील बारूळ येथील निम्न प्रकल्पातून जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे.

Latur News
Latur News: कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज; गरजेपेक्षा दुप्पट ऑक्सिजनची व्यवस्था

या जलकुंभासाठी जमीन संपादित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्याची माहिती जलजीवन मिशनचे शाखा अभियंता संजय स्वामी यांनी दिली. जळकोट तालुका हा डोंगरी असल्याने तालुक्यात तीव्र पाणीटंचाई जाणवते. तालुक्यातील गावांना शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, म्हणून माजी राज्यमंत्री आ. संजय बनसोडे यांनी राज्य शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून- या योजनेला मंजुरी मिळवून घेतली आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com