
>> निवृत्ती बाबर, साम टीव्ही
Uddhav Thackeray To District Head: 'मिंधे सरकार आल्यावर जातीद्वेष्याचे कोंब फुटून आले आणि दंगली भडकू लागल्या आहेत अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी राज्यातील हिंसाचाराच्या घटनांवर शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
शिवसेना भवन येथे ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांना उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी त्र्यंबकेश्वर येथील प्रकरणावरून शिंदे-फडणवीस सरकारला टार्गेट केलं.
'मिंधे सरकार आल्यावर जातीद्वेष्याचे कोंब फुटून आले'
उद्धव ठाकरे म्हणाले, "मिंधे सरकार आल्यावर जातीद्वेष्याचे कोंब फुटून आले आणि दंगली भडकू लागल्या आहेत. महाविकास आघाडीच्या काळात जातीय दंगली झाल्या नव्हत्या. कोरोना काळात सर्व सण आणि मंदिर बंद होती. त्याही वेळेला आम्ही मिरवणुका काढणारच असा अताताहीपणा कोणी केला होता? असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले.
'आम्ही दंगली घडू दिल्या नव्हत्या'
पुढे बोलताना ते म्हणाले, त्यावेळेला आम्ही दंगली घडू दिल्या नव्हत्या. आता सरकार बदललं आहे आता दंगली घडत आहेत. अवाजवी प्रलोभण दाखवून निवडून यायचे आणि जनता प्रश्न विचारायला लागली की दंगली घडवायच्या, हीच भाजपची निती असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. (Breaking News)
'कर्नाटकमध्ये कानडी जनतेने भाजपला गाडले'
कर्नाटकमध्ये कानडी जनतेने भाजपला गाडले तसे महाराष्ट्रातही गाडा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुख यांना मार्गदर्शन करताना केले. ते म्हणाले, कर्नाटक पॅटर्न ठाकरे गटाकडून महाराष्ट्रात राबवला जाणार आहे. कर्नाटकमध्ये डी के शिवकुमार लोकांना भेटत राहिले, लोकांपर्यंत त्यांचे काम पोहचवत राहिले, असंच काम आपल्याला राज्यात करायंच असे मार्गदर्शन त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले. (Latest Political News)
'भाजपचे मिशन 400 कर्नाटकमध्ये उताणी पडलं'
यावेळी उपस्थित पदाधिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपचे मिशन 400 कर्नाटकमध्ये उताणी पडलं आहे. तेथील जनतेने वास्तव ओळखले आणि त्यांच्या बेगडी हिंदुत्वाच्या प्रचाराचे थोतांड उघडं पाडलं आहे, हेच काम आपल्याला महाराष्ट्रात करायचं आहे. त्यांनी पाच वर्ष रोष जनतेपर्यंत पोहचवला, आपल्याला हे काम आठ महिन्यात करायचं आहे. (Latest Marathi News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.