Nitin Gadkari Threat Case: नितीन गडकरी धमकी प्रकरणात मोठी अपडेट, अफरस पाशाने बांगलादेशात दिलेली दहशतवादी ट्रेनिंग

Nitin Gadkari Threat Calls: अफरस पाशाने अल-कायदाच्या (Al-Qaeda ) महिला दहशतवादीसोबत बांगलादेशमध्ये लग्न केले होते.
Union Minister Nitin Gadkari Threat Call Case Terrorist Afsar Pasha Shocking information Nagpur police
Union Minister Nitin Gadkari Threat Call Case Terrorist Afsar Pasha Shocking information Nagpur policeSaam Tv

संजय डाफ, नागपूर

Nagpur News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) धमकी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाचा (Nitin Gadkari Threat Case) मास्टरमाईंड आणि दहशतवादी अफसर पाशाने दीड वर्षे बांगलादेशात दहशतवादी ट्रेनिंग दिले होते. तसंच त्याने अल-कायदाच्या (Al-Qaeda Terrorist Organization) महिला दहशतवादीसोबत बांगलादेशमध्ये लग्न केले होते अशी माहिती तपासातून उघड झाली आहे. या प्रकरणाच्या तपासातून दिवसेंदिवस धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Union Minister Nitin Gadkari Threat Call Case Terrorist Afsar Pasha Shocking information Nagpur police
NCP Split: राष्ट्रवादी पुन्हा फुटणार? अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार गटात फूट; काही आमदारांना सत्तेचे वेध - सूत्र

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातला मुख्य आरोपी अफसर पाशाने बांगलादेशमध्ये दहशतवादी ट्रेनिंग दिली होती. ऐवढंच नाही तर अफसर पाशाने अलकायदाची महिला दहशतवादी फातिमाशी बांगलादेशामध्येच लग्न केले होते. फातीमा सौदी अरेबियातून बांगलादेशात आली होती. अफसर आणि फातिमा दोघेही मिळून बांगलादेशमध्ये दहशतवादी कारवायांसाठी ट्रेनिंग देत होते.

Union Minister Nitin Gadkari Threat Call Case Terrorist Afsar Pasha Shocking information Nagpur police
Mexico Bar Set On Fire: दारुड्याची सटकली! बारमधून बाहेर काढल्यामुळे लावली आग, ११ जणांचा मृत्यू

दीड वर्षांत बांग्लादेशात फातिमा आणि अफसर पाशा या दोघांनी शेकडो दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. अल कायद्याचा विदेशी पाहुणा म्हणून अफसर पाशा दीड वर्षे बांगलादेशात राहिला. बांगलादेशातून भारतात आल्यानंतर त्याने दहशतवादी कारवाया केल्या. नितीन गडकरी धमकी प्रकरणात सध्या अफसर पाशा हा नागपूर पोलिसांच्या ताब्यात आहे. आज अफसरला कोर्टात हजर करण्यात आले होते. लवकरच नागपूर पोलीस या प्रकरणात चार्जशीट दाखल करणार आहेत.

Union Minister Nitin Gadkari Threat Call Case Terrorist Afsar Pasha Shocking information Nagpur police
Sanjay Raut On Ajit Pawar: हातात तिजोरी आहे म्हणून निधीवाटप करायचा म्हणजे लुटमार; निधीवर्षावावरुन संजय राऊतांचं अजित पवारांवर टीकास्त्र

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नागपूर पोलिसांनी अफसर पााला अटक केली आहे. दहशतवादी नेटवर्क वाढवण्यासाठी तो २००३-०४ मध्ये मध्य नागपुरात वास्तव्याला होता. त्याने या दरम्यान काही लोकांच्या भेटी देखील घेतल्या होत्या. बेळगावच्या तुरुंगातून तो लष्कर-ए-तोयबाचा स्लिपर सेल चालवत होता, ही माहिती पोलीस तपासातून उघड झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील (RSS) रागामुळे नितीन गडकरी यांना धमकीचा फोन केला असल्याचं अफसर पाशाने पोलिसांना सांगितलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com