Verul-Ajanta Festival: पुन्हा सुरू होणार वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव, नागरिकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी

Verul-Ajanta International Festival: मागच्या काही वर्षात दुष्काळ, अतिवृष्टी आणि कोरोनामुळे हा महोत्सव होऊ शकला नाही.
Verul-Ajanta International Festival
Verul-Ajanta International Festival

Verul-Ajanta International Festival: संभाजीनगर हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असल्याने ती ओळख अधिक दृढ करण्यासाठी 1985 पासून वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजित केला जातो. मात्र मागच्या काही वर्षात दुष्काळ, अतिवृष्टी आणि कोरोनामुळे हा महोत्सव होऊ शकला नाही. मात्र यंदा हा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.

येत्या 25, 26 आणि 27 फेब्रुवारी रोजी संभाजीनगरमधील सोनेरी महाल येथे नागरिकांना आणि पर्यटकांना सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी मिळणार आहे. याठिकाणी जागतिक दर्जाच्या सुप्रसिध्द कलाकारांमार्फत शास्त्रीय व उपशास्रीय, गायन व शास्त्रीय नृत्य सादर केले जाणार आहे.

या महोत्सवामध्ये उस्ताद राशीद खान, उस्ताद सुजात खान, महेश काळे, रवी चारी, शिवमनी, विजय घाटे, संगीता मुजूमदार आणि शंकर महादेवन हे कलाकार आपली कला सादर करणार आहेत.

Verul-Ajanta International Festival
PM Modi: यूपीएने प्रत्येक संधीचं रूपांतर संकटात केलं, 2004 ते 14 हा काळ 'लॉस्ट डेकेड'; पंतप्रधान मोदींचं प्रत्युत्तर

जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने 1985 पासुन वेरुळ येथील कैलास लेणी समोरील जागेमध्ये जगविख्यात वेरूळ महोत्सव आयोजित करण्याची सुरूवात केली होती. या महोत्सवाचे रूपांतर 2002 पासून वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवात करण्यात आले. (Latest Marathi NEWS)

हा महोत्सव जिल्हा प्रशासन, संयोजन समीती आणि पर्यटन संचालनालय यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित करण्यात येतो. गेल्या वेळी 2016 साली वेरूळ -अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु मागील काही वर्षांत विविध कारणामुळे हा महोत्सव होऊ शकला नाही.

वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाची घोषणा करणाऱ्या पूर्वरंग कार्यक्रमाचे आयोजन यानिमित्त करण्यात आले आहे. रविवारी १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी संत एकनाथ रंगमंदिर येथे हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमात सोनिया परचुरे आणि टीम कृष्णा "बॅले" सादर करतील. त्यानंतर "सांज अमृताची" हा मराठी-हिंदी गीतांचा विशेष कार्यक्रम होणार आहे.

Verul-Ajanta International Festival
PM Modi Speech : "तुम्हारे पाँव के नीचे कोई ज़मीन नहीं..." पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर पलटवार

गीत गझल सुफी संगीत याचा मेळ असलेल्या या कार्यक्रमात शाल्मली सुखटणकर, आशिष देशमुख, मंदार आपटे, माधुरी करमरकर हे गायक सहभागी होतील. सांज अमृताची कार्यक्रमाचे निवेदन धनश्री दामले करणार आहे. पूर्वरंग उद्घाटनानंतर हे कार्यक्रम होतील.

मान्यवरांच्या हस्ते होणार उद्घाटन!

वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाची नांदी असलेला पूर्वरंग कार्यक्रमाने महोत्सवाला सुरुवात होईल. याचे उद्घाटन रविवारी १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. लकमंत्री संदीपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com