RPI ला धक्का, माेठ्या नेत्याने Congress चा धरला 'हात'

यावेळी आमदार यशाेमती ठाकूर यांच्यासह मान्यवर कार्यक्रमास उपस्थित हाेते.
amravati news, rpi, congress
amravati news, rpi, congresssaam tv

- अमर घटारे

Amravati News : अमरावतीच्या राजकीय वर्तुळात एक माेठी हालचाल झाल्याने रिपाईला (republican party of india) मोठा धक्का मानला जात आहे तर काॅंग्रेसमध्ये (congress) चैतन्याचे वातावरण पसरले आहे. याचे कारण म्हणजे दादासाहेब गवई यांचे निकटस्थ रामेश्वर अभ्यंकर (rameshwar abhyankar) यांनी काँग्रेसमध्ये केलेला प्रवेश हाेय. (Maharashtra News)

amravati news, rpi, congress
Mahavitran च्या सहाय्यक अभियंता रक्तबंबाळ, NCP अजित पवार गटाच्या पदाधिका-यासह भाजप नगरसेवकावर गुन्हा दाखल

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे व केरळ- बिहारचे माजी राज्यपाल दादासाहेब गवई यांचे निकटस्थ मानले जाणारे रिपाइंचे नेते रामेश्वर अभ्यंकर यांनी काँग्रेसमध्ये आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. राज्याचे विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार (vijay wadettiwar) हे अमरावती जिल्हा दौऱ्यावर आले असता अचलपूर येथील जाहीर सभेत रामेश्वर अभ्यंकर यांनी हा प्रवेश केला.

amravati news, rpi, congress
Coronavirus Update : ठाण्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय, महापालिका सतर्क

यामुळे राज्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाला मोठा हादरा बसला आहे. गेल्या 40 वर्षांपासून अभ्यंकर हे माजी राज्यपाल रा. सु .गवई व रिपाईचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांच्याशी जुडलेले होते. त्यामुळे रिपई कार्यकर्त्यांची चिंता वाढली आहे.

रामेश्वर अभ्यंकर यांच्या पाठोपाठ जिल्ह्यातील 400 ते 500 कार्यकर्ते हे काँग्रेसमध्ये दाखल होणार असल्याचं अभ्यंकर यांनी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com