Wardha Corona Update: कोरोनाचा धोका वाढतोय; वर्ध्यात २४ तासात ९ कोरोना बाधित

कोरोनाचा धोका वाढतोय; वर्ध्यात २४ तासात ९ कोरोना बाधित
Wardha Corona Update
Wardha Corona UpdateSaam tv

चेतन व्यास

वर्धा : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. राज्‍यातील अनेक जिल्‍ह्यांमध्‍ये हा धोका वाढत चालला असून कोरोना (Corona) बाधितांची संख्‍या देखील वाढत आहे. त्‍यानुसार (Wardha) वर्धा जिल्‍ह्यात देखील कोरोनाचा धोका वाढत असून मागील २४ तासात ९ कोरोना बाधित आढळून आले आहेत. (Tajya Batmya)

Wardha Corona Update
Bus Accident: भल्‍या पहाटे मोठा आवाज आला अन्‌ सुरू झाली पळापळ; चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसला अपघात

वर्धा जिल्ह्यात मागील २४ तासात १८० कोरोना चाचणी झाली. यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा आकडा ९ वर पोचलाय. परिणामी प्रशासनासह सामान्य नागरिकही दहशतीत आले आहेत. कोरोना बाधितांची संख्‍या वाढत असल्‍याने प्रशासनाने देखील खबरदारीची उपाययोजना सुरू केली आहे. शिवाय नागरीकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Wardha Corona Update
Chandrashekhar Bawankule: मातोश्री बाहेर येवून बैठक घेताय हे लोकशाहीसाठी चांगले; चंद्रशेखर बावनकुळे यांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

२६ वर पोहचली बाधितांची संख्‍या

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्‍याने बाधितांची संख्‍या कमी झाली होती. मध्‍यंतरी जिल्‍ह्यात एक देखील बाधित नव्‍हता. मात्र मागील महिनाभरात हळूहळू संख्‍या वाढत असून आता जिल्‍ह्यातील एक्टिव्ह पॉझिटिव्हची संख्या २६ वर पोहचली असून या संख्येतही मोठी वाढ होत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com