बीड जिल्ह्यातील पाणी प्रश्न मिटला; माजलगावचं धरण 100 टक्के भरले

बीडच्या केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणात 70.30 टक्के पाणीसाठा आहे.
Beed News
Beed NewsSaam Tv

बीड - जिल्ह्यात सद्यस्थितीत पाऊस कमी अधिक प्रमाणात असला तरी, धरणाच्या पाणीसाठ्यात मात्र वाढ होताना दिसून येत आहे. बीडच्या (Beed) माजलगावकचे धरण 100 टक्के भरले आहे. तर बीडच्या केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणात 70.30 टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील माजलगावच्या (Majalgaon Dam) धरणात जायकवाडी धरणाच्या कालव्यातून पाणी सोडल्याने, त्याचबरोबर जिल्ह्यातील सिंदफणा, बिंदुसरा, कुंडलिका यासह अनेक नद्या वाहू लागल्याने, त्याचे पाणी माजलगावच्या धरणाला येते. (Tajya Batmya)

Beed News
Delhi Weather Update: दिल्ली-एनसीआरला पुन्हा पावसाने झोडपलं; नागरिकांचे प्रचंड हाल

त्यामुळं माजलगाव धरणातील पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली. त्यामुळे आता धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर बीडच्या केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणाच्या पाणी साठ्यात देखील वाढ होत आहे. धरण क्षेत्रात असणाऱ्या संगमेश्वर प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानं, त्याचबरोबर मांजरा नदीला पाणी आल्यामुळे, या धरणाच्या पाणी साठ्यात मोठी वाढ होत आहे.

दरम्यान माजलगावच्या धरणामुळे माजलगावसह बीड शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. तर मांजरा धरणात वाढत असणाऱ्या पाणीसाठ्यामुळे बीड, लातूर, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांचा देखील पाणीप्रश्न मिटण्याच्या मार्गावर आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com