मंगलदास बांदल यांना १ जून पर्यंत पोलिस कोठडी

रोहिदास गाडगे
गुरुवार, 27 मे 2021

 फसवणुकीच्या गुन्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे. मंगलदास बांदल यांना आज (गुरुवार) शिरूर न्यायालयाच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे समोर हजर केले असता न्यायालयाने बांदल यांना एक जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पुणे - फसवणुकीच्या गुन्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस NCP पक्षाचे नेते आणि माजी प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल Mangaldas Bandal यांना शिक्रापूर Shikrapur पोलिसांनी Police अटक केली आहे. मंगलदास बांदल यांना आज (गुरुवार) शिरूर न्यायालयाच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे समोर हजर केले असता न्यायालयाने बांदल यांना एक जून पर्यंत पोलिस कोठडी police custody सुनावली आहे. Mangaldas Bandal remanded in police custody till June 1

शिक्रापूर पोलिसांनी मंगलदास बांदल, जिल्हा परिषद सदस्या रेखा मंगलदास बांदल, गोविंद शंकर झगडे, मोहन जयसिंग चिखले यांच्यासह एका अनोळखी इसमावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. शिक्रापूर येथील दत्तात्रय रावसाहेब मांढरे यांच्या जागेतील गाळ्यांचे बनावट व्यक्ती उभी करून बोगस गहाणखत बनवून शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे तब्बल एक कोटी पंचवीस लाख रुपये कर्ज काढून बँकेचे कर्ज न भरता दोन कोटी पन्नास लाख रुपये थकवून फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा -

पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांना अटक केली. त्यांनतर आज मंगलदास बांदल यांना शिरुर न्यायालयात हजर केले असता न्यायलयाने मंगलदास बांदल यांचा जामीन नामंजूर करत त्यांना एक जून 2021 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे हे करत आहे.Mangaldas Bandal remanded in police custody till June 1

1 जूननंतरही लाॅकडाऊन राहणारच..राजेश टोपेंचं सुतोवाच

ज्यावेळी मंगलदास बांदल यांना पोलिसांनी अटक करून शिरूर येथील कस्टडीत ठेवण्यात आले. त्यावेळी या गुन्ह्यातील सहआरोपी रेखा बांदल व मोहन चिखले शिरुर पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये शिक्रापूर पोलिसांच्या समोर हजर असल्याचे बोलले जात आहे. याचे चित्रकरण देखील शिरुर पोलिसांच्या सीसीटीव्ही कॅमेरेमध्ये कैद झाले आहे. मात्र जी तत्परता मंगलदास बांदल यांना अटक करण्यात दाखवली तिच तत्परता इतर आरोपींना अटक करण्यात का दाखवली नाही ? असा प्रश्न उपस्थित करत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

Edited By - Shivani Tichkule


संबंधित बातम्या

Saam TV Live