स्टेट बँक खातेधारकांसाठी महत्वाची बातमी... खातेधारकांसाठी नवीन नियम

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 12 मार्च 2020

मुंबई : स्टेट बँक खातेधारकांनी एक महत्वाचा बदल केलाय. त्यांच्या खातेधारकांसाठी दिलासा आपण म्हणू शकतो. कारण आता खात्याचे काही नवीन तुमच्यासाठी फायद्याचे ठरु शकतात. 

स्टेट बॅंक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी बचत खात्यावर दर महिन्याला किमान शिल्लक रक्कम (मिनिमम बॅलन्स) ठेवण्याची अट शिथिल केली आहे. तसेच, बॅंकेने ग्राहकांसाठी ‘एसएमएस’चे शुल्कही माफ केले आहे. 

देशभरातील बॅंकेच्या सर्व ४४.५१ कोटी बचत खात्यांसाठी बॅंकेने ही घोषणा  केली आहे. बॅंकेच्या बचत खातेधारकांना महानगर, निमशहरी आणि ग्रामीण भागात दर महिन्याला अनुक्रमे तीन हजार रुपये, दोन  हजार रुपये आणि एक हजार रुपयांची रक्कम खात्यामध्ये ठेवावी लागते. खातेधारकांनी दर महिन्याला किमान शिल्लक रक्कम बचत खात्यात न ठेवल्यास बॅंकेकडून ५ ते १५ रुपये अधिक कर असा दंड आकारला जातो. 

बचत खात्यासाठी ३ टक्के व्याज
बॅंकेने बचत खात्यांसाठी वार्षिक ३ टक्के व्याजदर दिला जाणार असल्याचे जाहीर केले आहे. बॅंकेत ३१ डिसेंबर २०१९ अखेर ३१ लाख कोटी रुपयांच्या ठेवी असून, बॅंकेच्या देशभरात २१ हजार ९५९ शाखा आहेत.

हेही वाचा : 13 जिल्हा बॅंकांचे 370 कोटी रुपये येस बॅंकेत अडकले
 
Web Title: State Bank of India removes minimum balance requirement

संबंधित बातम्या

Saam TV Live