Corona Updates | देशात कोरोना रुग्णांची संख्या 57 लाखांवर, तर मृतांचा आकडाही 91 हजारांच्या पार

साम टीव्ही
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

देशातील कोरोना रुग्णसंख्येने 57 लाखाचा टप्पा ओलांडलाय. गेल्या 24 तासांत देशात 86 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आलेत. तर मृतांचा आकडाही 91 हजारांच्या पार गेलाय.

देशात कोरोनाचा कहर थांबताना दिसत नाहीये.  देशातील कोरोना रुग्णसंख्येने 57 लाखाचा टप्पा ओलांडलाय. गेल्या 24 तासांत देशात 86 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आलेत. तर मृतांचा आकडाही 91 हजारांच्या पार गेलाय.

कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातलंय. या विषाणूने आतापर्यंत 9 लाख 38 हजार नागरिकांचा बळी घेतला आहे. गेल्या 24 तासात जगभरात कोरोनाचे 2 लाख 76 हजार रुग्ण वाढलेत. यामुळं जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 3 कोटीवर पोहोचलीय.

हेही वाचा -

कोरोनाचं घातक रूप आता महाराष्ट्रात? पुणे, सातारा, नाशिकमध्ये धोका वाढला?

दरम्यान, आतापर्यंत 2 कोटी 15 लाख रुग्ण उपचारानंतर बरे झालेत. जगातील जवळपास सर्व प्रमुख देश या विषाणूविरोधात लढत आहेत.  दरम्यान या विषाणूला रोखण्यासाठी बहुतांश ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आलंय.

देशासह दिवसेंदिवस महाराष्ट्राची परिस्थितीही गंभीरच होत चालली आहे. त्यामुळे, कोरोनाचा फटका सर्वांनाच बसतोय. दरम्यान पुणे, नाशिक, औरंगाबाद याठिकाणीही कोरोनाचा कहर वाढतोय. सध्या

 


संबंधित बातम्या

Saam TV Live