काँग्रेसला हादरा! ज्योतिरादित्य शिंदे मोदींच्या भेटीस; आज करणार भाजप प्रवेश?

काँग्रेसला हादरा! ज्योतिरादित्य शिंदे मोदींच्या भेटीस; आज करणार भाजप प्रवेश?

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण गंभीर झाले असून काल मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सर्व मंत्र्यांचे राजीनामे मागवून घेतले आहेत. ऑपरेशन लोटस यशस्वी होणार की नाही, अशी चर्चा सुरू असतानाच आता नवीन एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. काँग्रेसच्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज सकाळी गृहमंत्री अमित शहा यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. आज संध्याकाळी ज्योतिरादित्य भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरू आहे.

ज्योतिरादित्य यांनी मध्य प्रदेशातील कमलनाथ यांच्याविरोधात बंड पुकारलं आहे. मध्य प्रदेशात काँग्रेसचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे सरकार ज्योतिरादित्य शिंदे यांनी रात्री घेतलेल्या भूमीकेमुळे अडचणीत आले आहे. मध्य प्रदेशात काल रात्री या नाट्यमय घडामोडी घडल्या. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी गेलेले कमलनाथ काल तातडीने राज्यात परतले. काल रात्री कमलनाथ यांनी तातडीने मंत्रीमंडळाची बैठक घेतली. त्यात २८ पैकी २० मंत्री उपस्थित होते. त्यापैकी सोळा मंत्र्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले. या मंत्र्यांनी मंत्री मंडळ फेररचनेचे पूर्ण अधिकारी कमलनाथ यांना दिले आहेत. 

मध्य प्रदेशात माजी खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी कमलनाथ यांच्या विरोधात शस्त्र उपसले आहे. वाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार सिंदिया यांनी १६ आमदारांना घेऊन बंगळुरु गाठले. त्यापैकी सहा जण कमलनाथ यांच्या सरकारमधील मंत्री आहेत. आता भाजपच्या पाठिंब्यावर ज्योतिरादित्य शिंदे मुख्यमंत्री होणार की पुन्हा एकदा शिवराज सिंह चौहान यांचे सरकार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या गटाच्या पाठिंब्यावर उभे राहणार, याबाबत राजकीय चर्चांना ऊत आला आहे.  

Web Title Jyotiraditya Scindia Meets PM Narendra Modi And Possibility To Enter BJP

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com