शनिवारपासून मुंबईला होणारा कांदा-बटाट्याचा पुरवठा बंद होण्याची शक्यता

शनिवारपासून मुंबईला होणारा कांदा-बटाट्याचा पुरवठा बंद होण्याची शक्यता

शनिवारपासून मुंबईला होणारा कांदा-बटाट्याचा पुरवठा बंद होण्याची शक्यता आहे. आज याबाबत वाशी एपीएमसीच्या संचालक मंडळाची बैठक होतेय, यात हा निर्णय घेतला जाऊ शकतो. वाशी बाजार समितीच्या मसाला मार्केटमध्ये काही दिवसांपूर्वी कोरोनाचा रुग्ण आढलला होता.इथल्या एका व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं. त्यामुळं बाजारात भीतीचं वातावरण पसरलंय. व्यापारी, दलाल आणि माथाडी कामगारांनी बाजार समिती बंद कऱण्याची मागणी केलीय.

याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना साकडंही घातलंय. आता यावर काय निर्णय होतो हे आज स्पष्ट होईल. मात्र, ही बाजार समिती बंद केली तर त्याचा मोठा परिणाम दैनंदिन जीवनावर होऊ शकतो. हेच पाहता बाजार समिती बंद करु दिली जाणार नाही असं तज्ज्ञांचं मत आहे.

पाहा सविस्तर व्हिडीओ - 

दरम्यान पुण्यातही तीच परिस्थिती आहे. पुण्यातील मार्केट यार्ड 10 तारखेपासून बंद राहणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीनं हा मोठा निर्णय घेतलाय. पुढील आदेश येईपर्यंत बाजार घटक बंद राहणार आहे. आडते आणि कामगार यांनी बंद चा निर्धार केल्यावर समितीने हा निर्णय घेतलाय. यामुळे पुणे शहरात पुढील दिवसात भाजीपाल्याचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे.

Web Title - The onion and potato supply to Mumbai will be shut down from Saturday


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com