पुण्याचे तापमान वाढणार

पुण्याचे तापमान वाढणार

पुणे - गेल्या चार-पाच दिवसांपासून शहर परिसरात रात्रीचा गारठा जाणवत आहे. काही भागांमध्ये दाट धुकेही पडत आहे. पुढील दोन दिवसांमध्ये रात्रीच्या तापमानात वाढ होईल. मात्र दिवसाच्या तापमानात वाढ होणार नसल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

गेल्या मंगळवारपासून सातत्याने किमान तापमानाचा पारा घसरत होता. सरासरीपेक्षा कमी होणारा हा पारा गेल्या बुधवारी १३.७ अंश सेल्सिअस नोंदला गेला. त्यामुळे शहर परिसरात रात्री गारठा वाढला. दिवस कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या जवळपास पोचला. त्यामुळे दिवसा उन्हाचा चटका आणि सूर्यास्तानंतर गारठा असे वातावरण होते.  

ढगाळ हवामानामुळे राज्यातील उकाड्यात वाढ झाली आहे. अरबी समुद्रावरून वारे वाहत असल्याने कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी आहे. पुढे उन्हाचा चटका वाढणार आहे. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात घट झाल्याने पहाटे गारठा जाणवत आहे. 

गारठा का वाढला?
कर्नाटक किनारपट्टीपासून ते मध्य प्रदेशपर्यंत असलेल्या द्रोणीय स्थितीचा प्रभाव कमी झाला. उत्तरेकडून राज्याच्या दिशेने वाहणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्याचा अडथळा कमी झाला. त्यामुळे शहर परिसरात गारठा वाढला. गेल्या चोवीस तासांपासून शहरातील आकाशात अंशतः ढग दिसत आहेत. त्याचा थेट परिणाम शनिवारी रात्रीपासून हवामानावर होत असल्याचे निरीक्षण खात्यातर्फे नोंदण्यात आले. रविवारी सकाळी साडेआठ वाजता शिवाजीनगर येथे किमान तापमान १५.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले. सरासरीपेक्षा ०.९ अंश सेल्सिअसने हे तापमान वाढले वाढले आहे.

विदर्भात गारपिटीचा इशारा 
विदर्भ, मराठवाड्यात उन्हाचा झळा वाढू लागल्या असतानाच अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात मात्र कमाल तापमानात घट झाली. पूर्व आणि पश्‍चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा संगम विदर्भात होत असल्याने परिसरात मंगळवारपासून (ता. १०) ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह गारपीट होईल. उर्वरित राज्यात हवामान ढगाळ राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  

Web Title Pune Temperature Will Increase

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com