पाहा, महाराष्ट्रात कुठे किती रुग्ण आणि काय आहे सध्याची परिस्थिती...

corona
corona

राज्यात कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेले २६ रुग्णांवर यशस्वी उपचारांमुळे खडखडीत बरे होऊन घरी गेले आहेत. दरम्यान, राज्यामध्ये शनिवारी आणखी २८ रुग्णांची भर पडली. त्यामुळे बाधित रुग्णांची संख्या १८१ झाली आहे.

या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक २२ रुग्ण मुंबईचे आहेत. तर, दोन रुग्ण नागपूर येथील आहेत. इतर ४ रुग्ण पालघर - वसई विरार आणि नवी मुंबई परिसरातील आहेत. पुण्यात तीन जणांना कोरोनाचे निदान झाले. कोरोनाचा संसर्ग झालेल्या आणि रुग्णालयात भरती असलेल्या १०४ रुग्णांना आजाराची कोणतेही लक्षण नाही. तर, ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान काल मुंबईत ज्या डॉक्टरांचा मृत्यू झाला तो कोरोनामुळे झाल्याचे आज निश्चित झाले. यामुळे राज्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता ६ झाली आहे.

राज्यात कोठे किती रुग्ण?
मुंबई - ७३ 
सांगली - २४ 
पुणे मनपा - २४ 
पिंपरी चिंचवड मनपा - १२ 
नागपूर - ११ 
कल्याण - डोंबिवली - ७ 
नवी मुंबई - ६ 
ठाणे - ५ 
यवतमाळ, वसई विरार प्रत्येकी - ४ 
नगर - ३ 
सातारा, पनवेल प्रत्येकी - २ 
उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, पुणे ग्रामीण, सिंधुदुर्ग, पालघर, कोल्हापूर, गोंदिया प्रत्येकी - १


 

Web Title: coronavirus maharashtra update 26 patient discharged from hospital

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com