लातूरातल्या लग्नाला चक्क २०० गायींचे वऱ्हाड!....पहा व्हिडिओ

दीपक क्षीरसागर
मंगळवार, 4 मे 2021

लातूरात Latur एक विवाह सोहोळा संपन्न झाला....या विवाहाला वऱ्हाडी होत्या दोनशे गाई .... बेत होता पुरणपोळीचा

लातूर : लग्न करताना डेस्टिवनशन वेडिंग  Destination Wedding... प्री वेडिंग शूट एक ना दोन अनेक प्रकार लोकप्रिय होते .. मात्र करोना काळात या सर्व प्रकारावर बंदी आली आहे ...कमी लोकांत कमी वेळेत लग्न ही संकल्पना पुढे येत आहे ... यातून लातूरात Latur एक विवाह सोहोळा संपन्न झाला....या विवाहाला वऱ्हाडी होत्या दोनशे गाई .... बेत होता पुरणपोळीचा! Marriage Function performed in Presence of Cows in Latur 

इथल्या गौशाळेत झालेल्या या अनोख्या लग्न सोहळ्याची चांगलीच चर्चा रंगलीये.....डॉक्टर Doctor भाग्यश्री आणि डॉक्टर सचिन....वधू आणि वर ... यांचा विवाह सोहळा संपन्न झाला आणि चक्क गोशाळेत ... अतिशय मोजके पाहुणे लग्नास हजर होते....कोविड Corona संसर्गामुळे आलेल्या बंधनाचे तंतोतंत पालन इथं केलं गेले...गोशाळेतील २०० पेक्षा जास्त गाई याच आमंत्रित होत्या... लातूर शहरातील माहेश्‍वरी समाजातील डॉक्टर भाग्यश्री गोपाळ झंवर  आणि जालना Jalana जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कुंभारी पिंपळगाव येथील डॉक्टर सचिन सत्यनारायण चांडक यांचा विवाह  श्री गुरु गणेश जैन गोशाळेत आज करण्यात आला.

जाणून घ्या कुठल्या कुठल्या शहरात आहे लाॅकडाऊन

हा विवाह सहा महिन्यापूर्वी ठरला होता.... मात्र कोविड संसर्गामुळे अनेक अडचणी निर्माण होऊ लागल्या होत्या... विवाह सोहोळ्यासाठी सरकारने घालून दिलेल्या कोणत्याही नियमाची Corona Rules पायमल्ली होणार नाही ह्या विचारावर दोन्ही परिवारातील पाहुण्यांचे एकमत झाले ... अतिशय कमी वेळेत कमी लोकांत लग्न करण्याचा विचार आला ... सध्या कोणतेही मंगल कार्यलय सुरु नाही .. हॉटेल बंद आहेत ... कोणाच्या घरी करणेही योग्य होणार नाही .. अशी चर्चा झाली...Marriage Function performed in Presence of Cows in Latur 

आणि मग एक कल्पना सुचली....ती गोशाळेची....विवाह सोहोळ्यात आशीर्वाद देण्यासाठी अनेक पाहुण्यांची हजेरी असते....पण आता पाहुणे कुठून मिळायचे?....आता आपले आप्तस्वकीय हे ह्या गाईच Cow आहेत ... ह्या भावनेतून लातूर शहरातील  श्री गुरु गणेश जैन गोशाळेत कार्य करावे असा विचार आला .. सर्वाना तो आवडला .. आज अतिशय मोजक्या लोकात हा विवाहविधी पार पडला ... गौशाळेतील गाईना पुरणपोळीचा बेत ठेवण्यात आला होता ..या गायींव्यतिरिक्त जे थोडे थोडके पाहुणे लग्नास हजर होते त्यांनी सर्व नियमाचे पालन करत कमी वेळात लग्न विधी पार पाडले!
Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live