आमदार दिलीप मोहिते पाटील हे राजकारणाला लागलेली काळी बुरशी - आढळराव पाटील  

रोहिदास गाडगे
शुक्रवार, 28 मे 2021

आमदार दिलीप मोहिते पाटील हे खेडच्या राजकारणाला लागलेली काळी बुरशी असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटलांनी पत्रकार परिषदेत केला.

पुणे -  राष्ट्रवादी काँग्रेसचे NCP आमदार दिलीप मोहिते पाटलांमुळेच Dilip Mohite Patil खेड Khed तालुक्यातील महाविकास आघाडीत बिघाडी झाली असुन कोरोना काळात पुण्यातील Pune डोणजे येथील रिसॉर्ट सुरु ठेवुन शिवसेनेचे 6 व राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 व भाजपचा एक असे 11 पंचायत समिती सदस्य व त्यांच्या कुटुंबियांना बेकायदा वास्तव्यास ठेवुन एकामेकांमधील वाद वाढविण्याची खुरापत खेड आमदार दिलीप मोहिते यांनी केली. त्यातच त्या रिसॉर्टवर खुनी हल्ला व विनंयभंग झाल्याचा दावा करण्यात आला मात्र असा कुठलाही प्रकार घडला नसुन ज्यांच्यावर आजपर्यंत विनयभंग व खुनाचे गुन्हे दाखल आहे अशा लोकांनीही वाद वाढविण्याचे काम केले असुन आमदार दिलीप मोहिते पाटील हे खेडच्या राजकारणाला लागलेली काळी बुरशी black fungus असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे Shivsena माजी खासदार शिवाजी आढळराव पाटलांनी Shivaji Adhalrao Patil पत्रकार परिषदेत केला.MLA Dilip Mohite Patil is a black fungus in politics

खेडचे पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्यावरील अविश्वास ठरावामुळे शुक्रवारी डोणजे येथील रिसॉर्टवर झालेल्या मारामारीनंतर, आमदार मोहिते यांनी या प्रकरणाचे सूत्रधार आढळराव पाटील असल्याचा आरोप केला होता. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आढळरावांनी आज बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

साताऱ्यात नगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा जेष्ठ नागरिकांना फटका

माझ्यावर सूत्रधार असल्याचा केलेला आरोप खोटा असून, मी अशा भानगडीत पडत नाही. अशा प्रकारचा थिल्लरपणा कधीही करणार नाही. जनतेलाही हे पटणार नाही. मोहिते यांच्यावर मात्र विनयभंगाचे, माराहाणीचे गुन्हे आहेत. आमदार होण्यापूर्वी त्यांच्यावर 302 चाही गुन्हा होता. त्यांनी माझ्यावर मारामारी प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा आरोप करणे हास्यास्पद आहे. मोहिते जेव्हा-जेव्हा सत्तेत येतात तेव्हाचे सत्तेचा दुरुपयोग करतात. मोहिते आमदार नसताना गेल्या पाच वर्षात खेड तालुक्यात शांतता होती, असे ते म्हणाले. MLA Dilip Mohite Patil is a black fungus in politics

मोहितेंना त्यांच्या पक्षातही कुणी विचारत नाही. त्यामुळे त्यांना मंत्रीपद दिले नाही, मी राजीनामा देतो. तहसीलदारांची बदली झाली नाही, मी राजीनामा देतो, असे बालिशपणाचे राजकारण करत असतात. तीन पक्षांची आघाडी असताना, घटक पक्षांच्या सदस्यांना फितवून, आमिषे दाखवून आणि बळजबरीने शिवसेनेच्या सभापतींवर अविश्वास ठराव दाखल करण्यात प्रवृत्त केले. त्यानंतर त्या सदस्यांना स्वतःच्या रिसॉर्टवर ठेवले. त्या ठिकाणी ३० ते ३५ गुंड नेऊन ठेवले. या गोष्टी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींपर्यंत गेल्या. ते बिंग फुटल्यानंतर, सर्वांचे लक्ष दुसरीकडे वळावे म्हणून त्यांनी हे कुभांड रचले. सभापती पोखरकर व त्यांच्या सहकाऱ्यांना त्या ठिकाणाहून शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्यांचे फोन आल्यानंतर, त्यांना घेण्यासाठी ते तेथे गेले होते. त्यावेळी तेथील उपस्थित गुंडांनी त्यांना विरोध केल्याने मारामारी झाली. परंतु गोळीबार झाला नाही व त्यांच्याकडे हत्यारेही नव्हती. सीसीटीव्हीत तसे दिसत नाही, असे आढळराव म्हणाले. 

या  प्रकरणाचा राज्यातील महाविकास आघाडीवर काही परिणाम होणार नाही. कारण इतर सर्व ठिकाणी आघाडीतील घटक पक्षांमध्ये परस्पर सामंजस्य आहे. पुणे जिल्ह्यातही सर्व तालुक्यांमध्ये एकमेकांचे चांगले संबंध आहेत. फक्त खेड तालुक्यातच नेहमी समस्या येते, त्याचे कारण दिलीप मोहिते असून त्यांच्यावर त्यांच्या पक्षाने कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.  

Edited By - Shivani Tichkule

हे देखील पहा -


संबंधित बातम्या

Saam TV Live