Vasai Mahavitaran Employee Death: वीजवाहिनी दुरुस्त करताना लागला विजेचा जोरदार झटका, २२ वर्षांच्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

Vasai Police: अभिजीत लंकेश्री (२२ वर्षे) असं या कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
Vasai Mahavitaran Employee Death
Vasai Mahavitaran Employee DeathSaam tv

चेतन इंगळे, वसई

Vasai News: वसईमध्ये (Vasai) वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करत असताना वीजेचा जोरदार झटका लागल्यामुळे महावितरणाच्या कर्मचाऱ्याचा (Mahavitran Employee) दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास घडली. अभिजीत लंकेश्री (२२ वर्षे) असं या कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

Vasai Mahavitaran Employee Death
Dahi Handi 2023: राज्यातील गोविंदांना सरकारकडून मोठं गिफ्ट, विम्यासाठी १८ लाख ७५ हजारांची रक्कम मंजूर

मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत लंकेश्री हा महावितरणाचा शिकाऊ कर्मचारी होता. वसईच्या सातीवली येथे वीज वाहिनी दुरुस्ती करण्यासाठी अभिजीत गेला होता. त्याचवेळी वीजेच्या खांबावर चढून तो दुरुस्तीचे काम करत होता. त्याचवेळी त्याला वीजेचा जोरात झटका लागला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. अभिजीत वसईच्या उमेलमान येथे राहत होता. गेल्या एका वर्षापासून तो महावितरणात शिकाऊ कर्मचारी म्हणून काम करत होता.

Vasai Mahavitaran Employee Death
Rahul Gandhi News : PM मोदींनी चीनवर बोलावं; राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा

सोमवारी रात्री सांतिवली नाका या भागातील वीज खंडीत झाली होती. वीजपुरवठा सूरु करण्यासाठी अभिजीत लंकेश्री घटनास्थळी दाखल झाला. विजेच्या खांबावर चढून तो दुरुस्तीचे काम करत होता. त्याचवेळी विजेचा धक्का लागून तो खाली पडला. स्थानिक नागरिकांनी त्यांना तात्काळ तुळींज येथील महापालिकेच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

Vasai Mahavitaran Employee Death
Bacchu Kadu News: 'NDA बैठकीचं निमंत्रण मिळालं, मात्र मी जाणार नाही', बच्चू कडू यांनी सांगितलं कारण...

अभिजीत लंकेश्रीच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या घटनेनंतर त्याच्य कुटुंबीयांनी वालिव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या घटनेमुळे महावितरणाच्या शिकाऊ कर्मचाऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. एखादा कर्मचारी शिकत असतो तेव्हा त्याला कोणत्या कामाची जबाबदारी द्यावी यावर ही आता प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com