Police Recruitment Exam: पोलिस भरती परीक्षेत कॉपी करणाऱ्या 'मुन्नाभाई'ला अखेर अटक

Mumbai News: कॉपी करताना पकडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची ही पोलिस भरतीसाठीची शेवटची संधी होती.
Police Recruitment Exam News
Police Recruitment Exam NewsSaam Tv

संजय गडदे, मुंबई

Mumbai Police: मुंबईमध्ये पोलिस (Mumbai Police) भरती प्रक्रिया परीक्षेदरम्यान गैरप्रकार झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबई पोलिस दलाच्या पोलिस कॉन्स्टेबल (Police Constable) या पदाच्या भरतीसाठी रविवारी मुंबईतील विविध केंद्रांवर लेखी परीक्षा पार पडली. या परीक्षेदरम्यान काही ठिकाणी कॉपी करण्याचे प्रकार समोर आले होते.

बोरिवली कस्तुरबा मार्ग पोलिस (Borivali Kasturba Marg Police) ठाण्याच्या हद्दीतील जे बी खोत शाळेतील परीक्षा केंद्रावर ब्लूटूथद्वारे कॉपी करणाऱ्या मुन्नाभाईला पोलिसांनी अटक केली आहे तो वरळी येथे राहणारा आहे.

Police Recruitment Exam News
Uttar Pradesh Crime : सावधान! तुमचा बॉयफ्रेंडही असं करू शकतो; लग्नाआधीच सासऱ्याच्या तिजोरीवर डल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉपी करताना पकडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची ही पोलिस भरतीसाठीची शेवटची संधी होती. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत पास होण्यासाठी त्याने युट्युबवरून कॉपी करण्याची ही कला शिकली. त्यानंतर त्याने ऑनलाईन पद्धतीने ब्लूटूथ पेन आणि मायक्रो इअरफोन मागवला होता.

Police Recruitment Exam News
Rakhi Sawant Brother Arrested: राखी सावंतच्या भावाला पोलिसांनी केली अटक, नेमकं काय आहे प्रकरण?

परीक्षेला पेपर सोडवत असताना त्याचा एक साथीदार वरळीतून त्याच्यासोबत संभाषण करत होता. परीक्षा देत असताना त्या विद्यार्थ्यांच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्याने त्याची तपासणी केली असता तो मायक्रो इयरफोनच्या मदतीने कॉपी करत असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

Police Recruitment Exam News
LinkedIn layoffs: नोकरी शोधण्यास मदत करणारी LinkedIn कंपनीच करणार कर्मचारी कपात, 716 कर्मचाऱ्यांना दाखवणार घरचा रस्ता

अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्याविरोधात कलम 417, 420 , 34 आणि विद्यापीठ कॉपी प्रतिबंधक कायदा सात आणि आठनुसार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांची वरळी येथून संवाद साधणाऱ्या त्याच्या मित्राचा देखील कस्तुरबा मार्ग पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान, पोलिस भरती परीक्षेत कॉपी करताना पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतले. यापैकी तिघांना पोलिसांनी 41 अ ची नोटीस देऊन सोडलेले. तर दोघांविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com