Bharat Gaurav Train: पुण्यातून 28 एप्रिलला धावणार पहिली ट्रेन 'भारत गौरव'; जाणून घ्या काय आहे खास?

First Bharat Gaurav train to run from Pune: भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या 'देखो अपना देश' आणि 'एक भारत श्रेष्ठ भारत' योजनेअंतर्गत पुण्यातून धावणार भारत पर्यटक ट्रेन
Bharat Gaurav Train
Bharat Gaurav TrainSaam Tv

सचिन जाधव

Pune News: केंद्र शासनाने सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात ’देखो अपना देश’ आणि 'एक भारत श्रेष्ठ भारत' योजनेअंतर्गत पर्यटनाकरिता ’भारत गौरव’ रेल्वेसेवा सुरू केली. या योजनेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, या सेवेद्वारे सर्वसामान्य नागरिकांना कमी पैशांमध्ये देशातील विविध पर्यटनस्थळे, धार्मिक तीर्थस्थळे, ऐतिहासिक ठिकाणे पाहायला मिळत आहे. (Latest Marathi news)

Bharat Gaurav Train
Pune News: धक्कादायक! सायबर चोरट्यांचा डॉक्टर महिलेला २३ लाखांचा गंडा; गुन्हा दाखल

’भारत गौरव’ रेल्वेसेवा आतापर्यंत मुंबईतूनच (Mumbai) सुरू होती. मात्र आता ती सेवा पुण्यातूनसुध्दा सुरू झाली आहे. 28 एप्रिल रोजी पुण्यातून पहिली 'भारत गौरव पर्यटक ट्रेन' ट्रेन सोडण्यात येणार आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) या ट्रेनचे उद्घाटन करणार आहे. ही ट्रेन दहा दिवस देशातील मुख्य धार्मिक स्थळे दाखवणार आहे.

ही गाडी पुण्यातून जगन्नाथ पुरी,कोलकत्ता,गया, वाराणसी आणि प्रयागराज या महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना भेट देणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या आयआरसीटीसीकडून या सेवेचे नाव ’पुरी गंगासागर दिव्य काशी यात्रा’ असे ठेवण्यात आले आहे. (Pune News)

Bharat Gaurav Train
Barsu Refinery Survey: बारसू रिफायनरी सर्वेक्षणाचा वाद पेटणार? विरोधी संघटनेच्या मुंबई अध्यक्षांना अटक

ट्रेन सुरु करण्यामागचा उद्देश काय?

भारतीय पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी भारतीय रेल्वेने 2021 मध्ये भारत गौरव योजना सुरु केली. देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या "एक भारत श्रेष्ठ भारत" आणि "देखो अपना देश" या उपक्रमांतर्गत भारत गौरव पर्यटक ट्रेनचा शुभारंभ करण्यात आला आहे. या डिलक्स एसी ट्रेनमध्ये एकूण 156 पर्यटक प्रवास करु शकतात. यात 1 एसी आणि 2 एसी कोचची व्यवस्था आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com