
Shivputra Sambhaji Mahanatya: पिंपरी-चिंचवड शहरातील एचए ग्राउंडवर शिवपुत्र संभाजी या महानाट्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या महानाट्याची फ्री पासेस मिळावी म्हणून एका पोलिस कर्मचाऱ्याने थेट आयोजकालाच धमकी दिल्याचा आरोप अभिनेता तसेच शिरूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे. हा पोलिस कर्मचारी पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील असल्याचं कोल्हे यांनी सांगितलं आहे. (Latest Marathi News)
अमोल कोल्हे यांची मुख्य भूमिका असलेलं शिवपुत्र संभाजी हा नाटक सध्या पिंपरी चिंचवड शहरातील एच ए ग्राउंड वर आयोजित करण्यात आला आहे. नाटकाला पिंपरी चिंचवडकरांचा भरघोस प्रतिसाद देखील मिळत आहे. मात्र, या महानाट्याच्या फ्री पासेस मिळाव्या म्हणून शहर पोलिस दलातील एका पोलिस (Police) कर्मचाऱ्यांनी चक्क नाटकाच्या आयोजकाला दम दिल्याचं अमोल कोल्हे यांनी सांगितलं आहे.
"फ्री पास दिल नाही, तर नाटक कसं होते ते मी पाहतो" असं म्हणत पिंपरी चिंचवड पोलीस दलातील एका कर्मचाऱ्यांनी चक्क नाटकाच्या आयोजकाला दम दिल्याचा आरोप खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे. नाटकाच्या आयोजकाला दम दिल्याचा आरोप स्वतः अमोल कोल्हे यांनी नाटकाच्या व्यासपीठावरून केला आहे.
त्यासोबतच त्यांनी गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशी करावी, अशी मागणी देखील केली आहे. एकीकडे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दिवसाढवळ्या राजकीय कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्त्यांची निर्घृण हत्या होत आहे.
आता पोलीसच किरकोळ मागणीवरून कलाकार आणि आयोजकांना दम देत असल्याचं आरोप खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे. शिवपुत्र संभाजी या नाटकाचं उद्घाटनच माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं होतं.
Edited by - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.