Pune Crime news
Pune Crime news Saam Tv

Pune News: पत्नी आणि तिच्या प्रियकराकडून पतीला मारहाण; त्रास सहन न झाल्यानं पतीनं संपवलं जीवन

पत्नी आणि तिचा प्रियकर सातत्याने त्रास देत असल्याने एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

सचिन जाधव

Pune News: पुण्यामधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. पत्नी आणि तिचा प्रियकर सातत्याने त्रास देत असल्याने एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना ऑगस्ट २०२२ मध्ये घडली. याप्रकरणी कुटूंबियांनी उशीरा तक्रार दिल्यानंतर तरूणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महिलेसह दोघांविरूद्ध सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Pune News)

रवींद्र चंद्रकांत किंद्रे (वय 35 रा. जिजाई प्लाझा, कुटे मळा, नर्हे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी आणि तिच्या मित्राविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र आणि आरोपी महिलेचे २०२० मध्ये लग्न झाले होते.लग्नानंतर तिची एका तरुणासोबत ओळख झाली होती.

Pune Crime news
Nagpur Crime : तरुणींना कमी वेळात जास्त पैसे कमावण्याचं आमिष दाखवलं अन्.., नागपुरातील धक्कादायक प्रकार

त्यानंतर तिने मित्रासोबत संबंध टिकविण्यासाठी रवींद्रसोबत सातत्याने वाद घातला. त्याला मारहाण करून वेळोवेळी मानसिक त्रास दिला. त्यामुळे त्रासाला कंटाळून रवींद्रने १७ ऑगस्टला २०२२ रोजी हरात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक राहूल यादव तपास करत आहेत.

Pune Crime news
Crime News: धक्कादायक! भीमा नदीत आढळला पाच तुकडे केलेला आणि शिर नसलेला मृतदेह, परिसरात खळबळ

आई फक्त मोठ्या भावाचा लाड करते म्हणून १५ वर्षीय मुलाने ५ व्या मजल्यावरून घेतली उडी

पुण्यामध्ये देखील एका १५ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ज्यावेळी पंधरा वर्षीय शुभमने उडी मारली त्यावेळी त्याच्यासमोर त्याची आई आणि मोठा भाऊ देखील उपस्थित होता. सकाळी शुभम उशिरा उठला आणि अंघोळीसाठी स्नानगृहात गेला असता त्याची आई त्याच्या मोठ्या भावाला जवळ घेऊन समजावत होती. आई आपल्यापेक्षा मोठ्या भावालाच अधिक जीव लावते असा समज करून शुभमने आई व भावासोबत वाद घातला. तसेच नंतर राहत्या घरातून खाली उडी घेत आत्महत्या केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com