धक्कादायक : बहिणीने आत्महत्या केली म्हणून पतीने कुऱ्हाडीने केली पत्नीची हत्या; स्वत:ही प्यायला विष

एकाच कुटुंबातील पती पत्नी आणि बहिण यांच्यात झालेल्या वादातून बहिणीने आत्महत्या (Sucide) केली आहे, तर बहिणीच्या आत्महत्येमुळे भावाने त्याच्या पत्नीची हत्या करुन स्वत: आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
धक्कादायक : बहिणीने आत्महत्या केली म्हणून पतीने कुऱ्हाडीने केली पत्नीची हत्या; स्वत:ही प्यायला विष
धक्कादायक : बहिणीने आत्महत्या केली म्हणून पतीने कुऱ्हाडीने केली पत्नीची हत्या; स्वत:ही प्यायला विषरोहिदास गाडगे

पुणे : पुणे जिल्ह्याच्या (Pune District) शिरूर तालुक्यातील (Shirur Taluka) मांडवगण फराटा येथे धक्कादायक घटना घडली असून एकाच कुटुंबातील पती-पत्नी आणि बहिण (Husband wife and Sister) यांच्यात झालेल्या वादातून बहिणीने आत्महत्या केली आहे, तर बहिणीच्या आत्महत्येमुळे भावाने त्याच्या पत्नीची हत्या करुन स्वत: आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर आहे. (Husband kills wife with ax as sister commits suicide)

हे देखील पहा -

काय झाल नेमक -

कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून पती पत्नी आणि बहीण यांच्यात हा वाद होऊन हि दुर्दैवी घटना घडली आहे. पती समीर भिवाजी तावरे (वय 35), पत्नी वैशाली तावरे (वय 28)आणि बहिण माया सोपान सातव (वय 32) यांच्यात रात्री काहीतरी कौटुंबिक वाद झाल्याने बहीण माया सातव यांनी टोकाचे पाऊल उचलत घराजवळील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.

धक्कादायक : बहिणीने आत्महत्या केली म्हणून पतीने कुऱ्हाडीने केली पत्नीची हत्या; स्वत:ही प्यायला विष
Pune: तरुणीने ओटीपी शेअर केला अन् पावणे दोन लाखांना बसला फटका

दरम्यान बहिणीने आत्महत्या (Sister's Suicide) केल्याचे भाऊ समीर याला कळताच समीर आणि पत्नी वैशाली यांच्यात सकाळी वाद झाला या वादातून पती समीर याने त्याच्या बायकोवरती कुऱ्हाडीने वार करत तिची हत्या केली. आणि स्वतः समीरही विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून समीरची प्रकृती सध्या गंभीर आणि चिंताजनक असून त्याच्यावर ती सध्या हॉस्पिटलमध्ये (Hospital) उपचार सुरू आहेत तर वैशाली तावरे आणि माया सातव यांचा यात मृत्यू झाला आहे.

मात्र या सर्व प्रकरणाचा उलगडा पोलिस तपासा नंतरच होणार असून या दुर्दैवी घटनेने परिसरात मात्र शोककळा पसरली आहे. कौटुंबिक वादातून एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींना असे टोकाचे पाऊल उचले आहे.सध्या शिरुर पोलिस (Shirur Police) सदर घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com