Harbour Train News: मुंबईकरांसाठी मोठी बातमी, हार्बर मार्गावर तब्बल ३८ तासांचा ब्लॉक; अनेक गाड्या रद्द

Mumbai Local News: रेल्वेने हार्बर मार्गावर तब्बल ३८ तासांचा मेगाब्लॉक घोषित केला आहे. शनिवारी (३० सप्टेंबर) रात्री ११ वाजेपासून ते सोमवारी (२ ऑक्टोबर) दुपारी १ वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे
Important News For Mumbai Citizens Central Railway announces 38 hours mega block in harbour line
Important News For Mumbai Citizens Central Railway announces 38 hours mega block in harbour lineSaam TV

Panvel/Belapur to Thane Train News:

गणेश विसर्जनाच्या जल्लोषात तल्लीन झालेल्या मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. रेल्वेने हार्बर मार्गावर तब्बल ३८ तासांचा मेगाब्लॉक घोषित केला आहे. शनिवारी (३० सप्टेंबर) रात्री ११ वाजेपासून ते सोमवारी (२ ऑक्टोबर) दुपारी १ वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. यादरम्यान बेलापूर ते पनवेल तसंच ट्रान्स हार्बर लाईनवर अप आणि डाऊन मार्गावर एकही ट्रेन धावणार नसून ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.  (Latest Marathi News)

Important News For Mumbai Citizens Central Railway announces 38 hours mega block in harbour line
Nanded News: तलावावर फिरायला गेले, पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले; दोन सख्ख्या भावंडांसह तिघांचा मृत्यू

हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन उपनगरीय सेवा बेलापूर, नेरूळ आणि वाशी स्थानकांपर्यंत (Mumbai News) असेल आणि तेथूनच ट्रेन सेवा सुरू राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवास करणं गरजेचं आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या २ नवीन अप आणि डाउन लाईन्सच्या बांधकामासह पनवेल उपनगरीय रीमॉडेलिंगचे काम करण्यात येणार आहे.

त्यामुळे या बांधकामाच्या सोयीसाठी हा ब्लॉक (Mega Block) घेतला जाणार आहे. ब्लॉक सुरू होण्यापूर्वी सीएसएमटीहून पनवेलसाठी शेवटची लोकल रात्री ९ वाजून २ मिनिटांनी सुटेल. ही लोकल ट्रेन रात्री १० वाजून २२ मिनिटांनी पनवेल स्थानकात दाखल होईल. दुसरीकडे अप हार्बर मार्गावर ब्लॉकपूर्वी पनवेलहून सुटणारी शेवटची लोकल शनिवारी रात्री १० वाजून ३५ मिनिटांनी सुटेल.

ही लोकल ११ वाजून ५४ मिनिटांनी CSMT स्थानकात दाखल होईल. त्यानंतर सीएसएमटीकडून पनवेलकडे आणि पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणारी कोणतीही लोकल नसेल. दरम्यान, हा ३८ तासांचा मेगाब्लॉक सुटल्यानंतर ब्लॉकनंतर २ ऑक्टोबरला सीएसएमटीहून पनवेलसाठी जाणारी पहिली लोकल १२ वाजून ०८ मिनिटांनी सुटेल.

ही लोकल १ वाजून २९ मिनिटांनी पनवेल स्थानकात पोहचेल. त्याचबरोबर पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणारी पहिली लोकल दुपारी १ वाजून ३७ मिनिटांनी सुटेल. ही लोकल २ वाजून ५६ मिनिटांनी सीएसएमटी स्थानकात दाखल होईल.

Edited by - Satish Daud

Important News For Mumbai Citizens Central Railway announces 38 hours mega block in harbour line
Dhule Ganpati Visarjan: धुळ्यात गणेश विसर्जनाला गालबोट, बाप्पाची मूर्ती घेऊन जाणाऱ्या टेम्पोने ४ जणांना उडवलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com