Prithvi Shaw News : क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या अडचणी वाढणार? अंधेरी कोर्टात तक्रार दाखल, काय आहे प्रकरण?

Cricketer Prithvi Shaw : दिल्ली कॅपिटल्स संघाचा विस्फोटक फलंदाज पृथ्वी शॉ याच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे.
Prithvi Shaw News
Prithvi Shaw NewsSaam TV

Cricketer Prithvi Shaw News : दिल्ली कॅपिटल्स संघाचा विस्फोटक फलंदाज पृथ्वी शॉ याच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, पृथ्वी शॉ विरोधात अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सोशल मीडिया स्टार सपना गिल हिच्यावर कथित हल्ला केल्याप्रकरणी पृथ्वी शॉ आणि त्यांच्या मित्रावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

सपना गिलने तक्रार करूनही पृथ्वी शॉ विरोधात कारवाई न करणाऱ्या विमानतळ पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करा, अशी मागणी सुद्धा या तक्रारीत करण्यात आली आहे. दरम्यान, आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ एप्रिलला होणार आहे. त्यामुळे पृथ्वी शॉ आणि सपना गिल प्रकरणात न्यायालय काय निर्णय घेतं याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे.

Prithvi Shaw News
RR vs PBKS Match : आज मैदानात उतरणार सर्वात महागडा खेळाडू; कशी असेल राजस्थान-पंजाबची प्लेईंग-११

पृथ्वी शॉ आणि सपना गिलमध्ये झाला होता वाद

१४ फेब्रुवारी रोजी मुंबईतील (Mumbai) सांताक्रूझ भागातील एका हॉटेलबाहेर पृथ्वी शॉ आणि सोशल मीडिया स्टार सपना गिल यांच्यात सेल्फीवरून वाद झाला होता. वादाचे रूपांतर हाणामारीत झालं होतं. या प्रकरणी सपना गिलला अटक देखील झाली होती. मात्र तिची जामीनावर सुटका झाली. यानंतर तिने पृथ्वी शॉवर विनयभंगाची तक्रार दाखल केली होती.

या प्रकरणात दाखल झालेल्या एफआयआरनुसार पृथ्वी शॉ आणि त्याचे मित्र पहाटे ४ वाजता कॅफेमध्ये डिनर करत होते. त्यावेळी गिल आणि त्याच्या मित्रांनी पृथ्वी शॉसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. शॉने काही सेल्फी काढूही दिले. मात्र गिल आणि त्यांचे मित्र आणखी सेल्फीची मागणी करू लागले. मात्र शॉने याला नकार दिला. (Latest sports updates)

यावेळी शॉने तो मित्रांसोबत डिनर करण्यासाठी आला आहे. त्याला कोणी डिसटर्ब करू नये अशी इच्छा आहे असे सांगितले. मात्र, तरी देखील ते सेल्फी काढतच होते. तेव्हा पृथ्वीने रेस्टॉरंटच्या मालकाला फोन करून चाहत्यांना हटवण्यास सांगितले. दरम्यान, रेस्टॉरंटच्या व्यवस्थापकाने चाहत्यांना तेथून बाहेर काढले. यावरून त्यांना राग अनावर झाला.

Prithvi Shaw News
Narayan Rane News : उद्धव ठाकरेंना अटक होणार? नारायण राणे काय म्हणाले, वाचा...

संतापलेले दोन्ही चाहते रेस्टॉरंटबाहेर पृथ्वी शॉची (Prithvi Shaw) वाट पाहत राहिले. बाहेर आल्यानंतर त्यांनी पृथ्वी शॉसोबत वाद घातला. आरोपींनी पृथ्वी शॉच्या कारवर बेसबॉलच्या बॅटने हल्ला केला होता. इतकंच नाही तर, आरोपींनी एका सिग्नलवर गाडी थांबवून त्याच्या कारची काच देखील फोडली. तसेच प्रकरण मिटवण्यासाठी पृथ्वीच्या मित्राकडे 50 हजार रुपयांची मागणी देखील केली होती.

दुसरीकडे "मी कोणालाही मारहाण केलेली नाही तसेच आम्ही पैसेही मागितलेले नाहीत. त्यांनी आमच्यावर चुकीचे आरोप केले आहेत. मी सेल्फीसाठीही कधी विचारलेलं नाही. आम्ही आमचं एन्जॉय करत होतो. यावेळी आमचे अनेक मित्र व्हिडिओ काढत होते. पृश्वी शॉ आणि त्याच्या मित्रांनी आमच्याकडे येऊन माझ्यासमोर माझ्या मित्रांना मारहाण केली. त्यांनी माझ्या प्रायव्हेट पार्टला स्पर्ष केला, असे गंभीर आरोप सपना गिल हिने केले होते.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com