Ketaki Chitale News :...तर शरद पवार यांनाही प्रतिवादी करा, केतकी चितळेची हायकोर्टाला विनंती, कारण...

केतकी चितळेची तिच्यावरील गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
Ketaki chitale News
Ketaki chitale News Saam Tv

Ketaki chitale News : अभिनेत्री केतकी चितळेची तिच्यावरील गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. गुन्हा रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रतिवादी करण्याची मागणी केतकी चितळेने केली आहे. (Latest Marathi News)

Ketaki chitale News
Beed | महेश मांजरेकरांविरोधात गुन्हा दाखल करा; बीडमध्ये बँड कलाकार आक्रमक

मुंबई उच्च न्यायालयात केतकीची मागणी

केतकी चितळेने गुन्हा रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेत शरद पवार यांना प्रतिवादी करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. यासाठी केतकीने नव्याने न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. केतकी चितळेने दाखल केलेल्या अर्जावर १८ जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल केतकी चितळेच्या (Ketaki Chitale) विरोधात राज्यभरात गुन्हे दाखल आहेत. मात्र, त्यापैकी शरद पवार (Sharad Pawar) यांनी एकही तक्रार स्वत: त्यांनी दिलेली नाही. त्यामुळे त्यांनाही यात प्रतिवादी करण्याची केतकी चितळेची मागणी आहे.

काय आहे प्रकरण?

मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळे (Ketki Chitle) आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. ती तिच्या वक्तव्यांमुळे अनेकदा अडचणीत देखील सापडली आहे. केतकीने काही महिन्यांपूर्वी तिच्या फेसबुक अकाउंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात पोस्ट शेअर केली होती.

अ‍ॅडव्होकेट नितीन भावे नावाच्या एका व्यक्तीने लिहिलेली पोस्ट केतकी चितळेने आपल्या फेसबुकवर शेअर केली होती. शरद पवारांनी जवाहर राठोड यांच्या कवितेच्या अनुषंगाने केलेल्या वक्तव्याबद्दलची ही पोस्ट असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर आता तिच्यावर कळवा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Ketaki chitale News
Ketaki Chitale: 'आमचे देवही दारू पितात, काली मातेला तर...'; केतकी चितळे पोस्टमुळं पुन्हा वादात

दरम्यान, याआधी देखील केतकी एका पोस्टमुळे अडचणीत सापडली होती. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलही तिने वादग्रस्त पोस्ट केल्यानंतर ती वादात सापडली होती. त्यावेळीही शिवप्रेमींनी तिला ट्रोल केले होते. त्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली होती. तर आता शरद पवारांविरोधात केलेल्या या फेसबुक पोस्टनंतर तिच्यावर कळवा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com