Pune Accident News: पुणे- नगर मार्गावर मोठी दुर्घटना; प्रवाशांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात

काही प्रवाशी जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Pune Accident News
Pune Accident NewsSaam TV

Pune Nagar Highway: पुणे- नगर मार्गावर आज पहाटे लोणीकंद येथे एका खाजगी बसचा भीषण अपघात झाला आहे. यात बस (Bus) पलटी झाली असून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. काही प्रवाशी जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.(Latest Pune News)

पुण्यात अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. यात अनेक घटनांमध्ये वाहन चालकांच्या चुकांमुळे अपघात झाल्याचे समजले आहे. अशात आरटीओकडून अशा व्यक्तींवर कारवाई देखील करण्यात येत आहे.

Pune Accident News
Delhi Crime News: 11 महिन्यांत पैसे दुप्पट! चित्रपटाचा ट्रेलर दाखवून साडेतीन कोटींची फसवणूक

पुणे-मुंबई द्रुतगतीमार्ग (Pune-Mumbai Expressway) आणि जुना पुणे-मुंबई महामार्गावर आरटीओकडून वाहने धोकादायक पद्धतीने चालवणाऱ्या लेन कटिंग करणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात आलाय. आतापर्यंत एक हजार 803 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

डिसेंबर 2022 ते एप्रिल 2023 पर्यंत लेन कटिंग करणाऱ्या बेशिस्त वाहनांवर 8 लाख 40 हजार 200 रुपये इतका दंड ठोठावण्यात आलाय. तसेच गेल्या चार महिन्यात वेग मर्यादा ओलांडणाऱ्या तीन हजार 771 वाहनांवर देखील मोठी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहनच्या भरारी पथकांची ही विशेष कारवाई केली जात आहे. बेशिस्त वाहन चालकांवर विशेष लक्ष दिले जात आहे.

Pune Accident News
Chandrapur Accident News: वळणावर ट्रॅक्‍टर अनियंत्रीत; ट्राॅली पलटून झालेल्‍या अपघातात २ ठार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com