
>> संजय गडदे, साम टीव्ही
Youngsters are scammed in the name of part time job: सायबर गुन्हेगारांनी आता आपली नजर मुंबईतील महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार महिला आणि गृहिणींकडे वळवली आहे. अशा अनेकांना पार्ट टाइम जॉबच्या नावाखाली करोडो रुपयांचा गंडा घातला असल्याचे नुकतेच मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने उघडकीस आणले आहे.
संपूर्ण मुंबईत मागील 4 महिन्यांच्या काळात अशा प्रकारचे 170 पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले असून यातील तब्बल 50 पेक्षा अधिक गुन्ह्यामध्ये प्रत्येकी 10 लाखांपेक्षा अधिक रक्कमेची फसवणूक झाल्याच्या तक्रारी सायबर पोलिसांकडे आल्या आहेत.
सर्व मिळून ही फसवणुकीची रक्कम अंदाजे साडेपाच कोटीपेक्षा अधिक असल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने आतापर्यंत 12 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 2 कॉम्प्युटर, 2 प्रिंटर, 3 लॅपटॉप, 1 सीसीटीव्ही कॅमेरा आणि 50 पेक्षा अधिक मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई पूर्व प्रादेशिक विभागाच्या हद्दीत ही घटना घडली आहे. यातील फिर्यादींना अज्ञात व्यक्तीच्या मोबाईलवरून पार्ट टाइम जॉबसाठी विचारणा झाली. हे काम वर्क फ्रॉम होम असेल असा दावा आरोपींकडून करण्यात आला. यातील फिर्यादींनी त्यासाठी होकार दिला. आरोपींनी त्यांना चित्रपटाचे रेटिंग, फूड रेटिंग, लाईक आणि शेअरिंग इत्यादी टास्क पूर्ण केल्यास बोनस मिळेल असे सांगितले.
त्यानंतर आरोपींनी लिंक पाठवली फिर्यादींनी संबंधित लिंकवर क्लिक करून आवश्यक माहिती भरली. टास्क पूर्ण केल्यानंतर आरोपींनी त्यांना बोनसची रक्कम देखील दिली. यामुळे फिर्यादींचा आरोपींवर विश्वास बसला. यानंतर आरोपींनी त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले आणि त्यांना नफा होत असल्याचे चित्र तयार केले. (Breaking News)
याचा फायदा घेत आरोपींनी फिर्यादीकडून लाखो रुपये घेतले. मात्र यातील एकही रुपया परत दिला नाही. दरम्यान फिर्यादींनी आरोपीला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी विरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा नोंदविला. (Latest Political News)
गुन्ह्याच गांभीर्य लक्षात घेऊन सायबर पोलिसांनी तात्काळ तपासासाठी वेगवेगळ्या सायबर पोलीस ठाण्याच्या टीम तयार केल्या. पाच सायबर पोलीस ठाण्यात तपासासाठी 10 टीम तयार करण्यात आल्या. यातील 3 तपास पथकांना तपासात चांगले यश मिळाले आहे. सायबर पोलिसांनी 8 वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करून एकूण 12 आरोपींना अटक देखील केली आहे. त्यांच्याकडून 2 कॉम्प्युटर, 2 प्रिंटर, 3 लॅपटॉप, 1 सीसीटीव्ही कॅमेरा आणि 50 पेक्षा अधिक मोबाईल जप्त केले आहेत. (Latest Marathi News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.