Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; भरधाव कारची ट्रकला धडक, 3 जणांचा जागीच मृत्यू

Mumbai-Pune Expressway Accident : कोळशाने भरलेल्या ट्रकला भरधाव वेगात जाणाऱ्या कारने जोरदार धडक दिली या धडकेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.
Mumbai-Pune Expressway Accident
Mumbai-Pune Expressway AccidentSaam TV

दिलीप कांबळे, साम टीव्ही

Mumbai-Pune Expressway Accident : मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनाताना पहायला मिळत आहे. आज पुन्हा एकदा मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. कोळशाने भरलेल्या ट्रकला भरधाव वेगात जाणाऱ्या कारने जोरदार धडक दिली या धडकेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. (Latest Marathi News)

Mumbai-Pune Expressway Accident
Aaadhar Card Updates : आधार कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी; निवडणुकीआधीच मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

अपघाताची माहिती मिळताच, स्थानिकासह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात (Accident) इतका भीषण होता की, तीनपैकी फक्त एकाच मृतदेहाची ओळख पटली. विजय विश्वनाथ खैर,रा.सातारा असं मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव असून इतर दोन जणांची ओळख पटवणे सुरू आहे.

दरम्यान, पोलिसांनी (Police) तिघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी यंत्रणाच्या मदतीने वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

Mumbai-Pune Expressway Accident
Buldhana News : खळबळजनक! 'अपनी रानी किसी की दीवानी हो गई', स्टेटस ठेवत काँग्रेस शहराध्यक्षाची आत्महत्या

मिळालेल्या माहितीनुसार, उर्से गावच्या परिसरात शु्क्रवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाग्रस्त कार ही मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत होती. त्याचवेळी महामार्गावरून एक कोळशाने भरलेला ट्रक जात होता. दरम्यान, भरधाव वेगात असलेल्या कारने या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारचालकासह दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com