Mumbai Temperature: वाढला उन्हाळा, तब्येत सांभाळा! मुंबईकरांनो वाढत्या उष्णतेपासून अशी घ्या काळजी

Mumbai Temperature: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ जाणवत आहे. दिवसा कडक ऊन तर रात्री गरमी जाणवत आहे.
Mumbai Temperature News
Mumbai Temperature NewsSaam TV

Mumbai Temperature: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ जाणवत आहे. दिवसा कडक ऊन तर रात्री गरमी जाणवत आहे. मुंबईत आज दिवभरात ३७ अंश कमाल तापमानाची नोंद झाली आहे. दिवसेंदिवस तापमानात मोठी वाढ होत असल्याने मुंबईकरांच्या जीवाची लाही लाही होत आहे. दरम्यान, तापमानापासून बचावासाठी मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने काही सूचना जारी केल्या आहेत.

Mumbai Temperature News
Chandrapur News: घरात गरम होतंय म्हणून महिला अंगणात झोपली; मध्यरात्री घडली भयानक घटना

मुंबईकर नागरिकांना विविध सोयी-सुविधा देणारी आपली बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईकर नागरिकांच्या आरोग्याची काळजी अविरतपणे घेत असते. यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सार्वजनिक आरोग्य खाते हे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनानुसार अविरतपणे कार्य करीत असते.

वर्षाचे बाराही महिने आणि वर्षातील तिन्ही ऋतुंमध्ये कार्यरत असणारे महानगरपालिकेचे सार्वजनिक आरोग्य खाते हे त्या-त्या ऋतुंमध्ये घ्यावयाच्या काळजीबाबत आवश्यकतेनुसार वेळोवेळी मार्गदर्शक सूचना जारी करीत असते. याच अनुषंगाने सध्याच्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘उन्हाळ्यामध्ये काय काळजी घ्यावी’ याबाबत कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ मंगला गोमारे यांनी कळविलेल्या मुद्देनिहाय सूचना पुढीलप्रमाणे आहेत.

Mumbai Temperature News
Crime News: ज्याच्याशी होणार होतं लग्न त्यानेच केला घात; तरुणीला हॉटेलात बोलावलं अन्...

उन्हाळ्यापासून बचाव कसा करावा?

• तहान लागली नसली तरी पुरेसे पाणी प्या.

• हलके, हलक्या रंगाचे, सैल आणि सच्छिद्र सुती कपडे घाला. उन्हात बाहेर जाताना संरक्षक गॉगल, छत्री / टोपी, शूज किंवा चप्पल वापरा.

• प्रवासात पाणी व कांदा सोबत ठेवा.

• मद्यपान, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेये (कोल्ड्रिंक्स) टाळा, यामुळे शरीराचे निर्जलीकरण होते.

• उच्च प्रथिनेयुक्त अन्न टाळा आणि शिळे अन्न खाऊ नका.

• तुम्ही बाहेर काम करत असाल, तर टोपी किंवा छत्री वापरा. शक्य असल्यास मोठ्या सुती कापडाने डोके व चेहरा झाकून घ्या.

• तुमच्या डोक्यावर, मानेवर, चेहरा आणि हातपायांवर ओलसर कापडही वापरा.

• पार्क केलेल्या वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राणी सोडू नका.

• तुम्हाला अशक्त किंवा आजारी वाटत असल्यास, ताबडतोब डॉक्टरांना भेटा.

• ओआरएस, लस्सी, तोराणी (तांदूळ पाणी), लिंबू पाणी, ताक, नारळपाणी इत्यादी घरगुती पेये नियमितपणे प्या. यामुळे शरीराला पुन्हा 'हायड्रेट' करण्यास मदत होते.

• जनावरांना सावलीत ठेवा आणि त्यांना भरपूर पाणी द्या.

• तुमचे घर थंड ठेवा, पडदे, शटर किंवा सनशेड वापरा आणि रात्री खिडक्या उघडा ठेवा.

• पंखे, ओले कपडे वापरा आणि वारंवार थंड पाण्याने आंघोळ करा.

Mumbai Temperature News
Jalna Crime News: मला तुझी बायको खूप आवडते, तरुणाचा थेट साडूला फोन; मेहुणीसोबत केलं संतापजनक कृत्य

उष्माघातामुळे बाधित झालेल्या व्यक्तीवर असा करा उपचार

व्यक्तिला थंड जागी, सावलीखाली ठेवा. तिला / त्याला ओल्या कपड्याने पुसून काढा / वारंवार शरीर धुवा. डोक्यावर सामान्य तापमानाचे पाणी घाला. मुख्य गोष्ट म्हणजे त्याच्या शरीराचे तापमान कमी करा.

• व्यक्तिला 'ओआरएस' प्यायला द्या किंवा लिंबू सरबत / तोराणी किंवा जे काही शरीराला 'रीहायड्रेट' करण्यासाठी उपयुक्त आहे, असे पेय द्या.

• व्यक्तिला ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जा. उष्माघात जीवघेणा ठरू शकतो म्हणून रुग्णाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे, हे सदैव ध्यानात ठेवा.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com