Nashik MLC Election : महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं; शुभांगी पाटील पिछाडीवर, सत्यजित तांबेंनी घेतली मोठी आघाडी

महाविकास आघाडीला नाशकात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
Shubhangi Patil, Satyajeet Tambe
Shubhangi Patil, Satyajeet Tambe saam tv

Nashik MLC Election Updates : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत दोन ठिकाणचे निकाल जाहीर झाले असून यामध्ये कोकणात भाजपने तर नागपुरात महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. अजूनही तीन जागांची मतमोजणी सुरू असून कोणत्या पक्षाचा उमेदवार विजय होणार? याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे. (Maharashtra Political News)

Shubhangi Patil, Satyajeet Tambe
Nagpur Election Result : तो भाजपचा उमेदवार नव्हताच; पराभवानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया

एकीकडे  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या बालेकिल्ल्यात विजयाचा झेंडा फडवणाऱ्या महाविकास आघाडीला नाशकात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण, नाशिकमधील महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील या तिसऱ्या फेरी अखेर पिछाडीवर आहे.

नाशिकमध्ये (Nashik) काँग्रेसमधून बंड करून अपक्ष अर्ज भरणारे सत्यजित तांबे सध्या आघाडीवर आहे. तिसऱ्या मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीअखेर सत्यजित तांबे यांनी तब्बल १५ हजार मतांची आघाडी घेतली असून त्यांना आतापर्यंत ३१ हजार ९ मतं मिळाली आहे. (Latest Marathi News)

दुसरीकडे शुभांगी पाटील या पिछाडीवर असून त्यांना तिसऱ्या फेरीअखेर १६ हजार ११६ मतं मिळाली आहे. अजूनही मतमोजणीच्या दोन फेऱ्या बाकी असून शुभांगी पाटील या पिछाडीवर पडत असल्याने महाविकास आघाडीच्या नेत्याचं टेन्शन वाढलं आहे.

Shubhangi Patil, Satyajeet Tambe
Nagpur MLC Election : भाजपच्या पराभवानंतर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, वंचितची साथ लाभली तर..,

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने काँग्रेस पक्षाकडून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. काँग्रेससाठी धक्कादायक बाब म्हणजे सत्यजीत तांबे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत.

त्यामुळे नाशिकची पदवीधर निवडणूक लक्षवेधी ठरली होती.महाविकास आघाडीने सगळी ताकद शिवसेनेच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या पाठिशी उभी केली. या लढतीत सत्यजीत तांबे यांचे पारडे जड मानले जात असले तरी अंतिम निकाल पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com