Pune Crime News : पुण्यात कोयता गँगनंतर पालघन गँग; गाडी हळू चालवा सांगितल्याने माजवली दहशत

पुण्यात कोयता गँगनंतर आता पालघन गँग समोर आली आहे.
pune Crime
pune CrimeSaam TV

सचिन जाधव

Pune Crime News : पुण्यात कोयता गँगनंतर आता पालघन गँग समोर आली आहे. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक येथील माळवाडी येथे गाडी हळू चालवा असे सांगितल्याने काही तरुणांनी हातात पालघन घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मोठा वाद पाहायला मिळाला. (Latest Marathi News)

pune Crime
Cyber Crime: तुम्हाला आलाय का हा मेसेज तर मग व्हा सावध! ‘व्हॉट्सॲप’वरून फसवणुकीचा प्रयत्न

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील (Pune) सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक येथील माळवाडी येथे पालघन गँगचा काही स्थानिक नागरिकांशी वाद झाला. काल, संध्याकाळी हा वाद झाला. या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.

नेमकं काय घडलं?

सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक येथील माळवाडी परिसरात काही तरुण जोरात गाडी चालवत होते. तिथे असलेल्या एका महिलेने मुलं खेळत असल्याने दुचाकीस्वारांना हळू गाडी चालवा म्हणून सांगितले. मात्र, त्याचा राग मनात धरुन त्या तरुणांनी थेट पालघन हे हत्यार काढले आणि दहशत माजवली.

pune Crime
Akola Crime News: मुलावर अनैसर्गिक अत्याचार; बोरं देण्याचे आमिष दाखवत 57 वर्षीय नराधमाचे कृत्‍य

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या हिडिओमध्ये दिसत असलेले हत्यार हे कोयता नसून पालघन आहे. पालघन हे कोयत्यासारखे दिसते पण त्याची लांबी कोयता पेक्षा जास्त असून शेती कामासाठी ते वापरले जातात.

घटनेतील ५ आरोपींना अटक

दरम्यान, याच तरुणांनी गावातील एका दुकानदाराकडून फुकट सिगारेट घेण्यासाठी दुकानदाराला धमकावल्याचीही महिती मिळाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी ५ जणांना अटक केली आहे. त्याची नावे सूरज ठाकूर, निलेश साह, अक्षय चव्हाण, सागर पाटील आणि अनिकेत मोरे असे आरोपींचे नाव आहेत.

कायदा सुव्यवस्था धाब्यावर

पुण्यात धारदार शस्त्र घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न सातत्याने होतोय. कोयता गँगने पुण्यात धुमाकूळ घातला आहे. त्यानंतर आता पालघन गँग देखील पुण्यात दहशत पसरवत आहे. त्यामुळे पुणेकरांच्या चितेंत भर पडली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com