परमबीर सिंग हे देशातच; 48 तासात CBI समोर यायलाही तयार, पण...

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह Parambir Singh भारतातच आहेत.
परमबीर सिंग हे भारतातचं; 48 तासात CBI समोर चौकशीसाठी हजर राहण्यास तयार
परमबीर सिंग हे भारतातचं; 48 तासात CBI समोर चौकशीसाठी हजर राहण्यास तयारSaam Tv

रश्मी पुराणिक

मुंबई: महाराष्ट्रात खळबळ उडवून देणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना काही दिवसांपूर्वीच फरार घोषित करण्यात आलं होत. परमबीर सिंह हे कुठे आहेत? अशी चर्चा सुरु होती, परंतु अखेर आज या प्रश्नाचं उत्तर मिळाले आहे. परमबीर सिंह हे भारताबाहेर नसून, ते भारत देशातच आहेत. अशी माहिती त्यांच्या वकिलांनी आज सुप्रीम कोर्टात (Supreme court) दिली आहे. तर पुढच्या ४८ तासात सीबीआयसमोर (Cbi) किंवा कोणतयाही कोर्टामध्ये ते हजर होण्यास तयार आहेत अशी माहिती त्यांनी सुप्रीम कोर्टात दिली आहे. तर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिले आणि तपासात सहभागी होण्याचे निर्देश दिले आहेत.

तर, परमबीर सिंग हे चौकशीसाठी समोर येणास तयार आहेत पण परमबीर यांच्या जीवाला धोका असल्यामुळे ते समोर आलेले नाहीत, असे त्यांच्यावतीने कोर्टात सांगण्यात आले आहे.

मात्र, परमबीर सिंह कुठे आहेत हे समजत नाही, तो पर्यंत खंडणी प्रकरणात अटकेपासून संरक्षण देणार नाही. असे सर्वोच्च न्यायालयाने मागच्या सुनावणीत स्पष्ट केले होते. काही दिवसांपूर्वी परमबीर सिंह चंदीगड येथे असल्याची आणि त्यानंतर ते बेल्जियमला निघून गेल्याची चर्चा सुरु होती.

दरम्यान, (ता. १७ नोव्हेंबर) माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्याविषयी न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. परमबीर सिंग यांना फरार घोषित करायचे की नाही यावर सुनावणी सुरू होती. त्यावेळेस किला कोर्टाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंह यांना न्यायालयने फरार घोषित केले होते.

गुन्हे शाखेतर्फे परमबीर सिंग यांना फरार आरोपी घोषित करण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली होती. परमबीर सिंग यांची उचलबांगडी झाल्यावर त्यांनी वाझे प्रकरणामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप करण्यात आले होते. यामध्ये देशमुखांना राजीनामा द्यावा लागला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com