पुणे: माजी आमदार विनायक निम्हण यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

पुण्यातून १५ वर्षे आमदार असलेले विनायक निम्हण यांचे आज निधन झाले.
Ex MLA Vinayak Nimhan passes away
Ex MLA Vinayak Nimhan passes awaySaam TV

पुणे : पुण्याचे माजी आमदार आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विनायक निम्हण यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. आज, बुधवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. निम्हण हे शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघाचे १५ वर्षे आमदार होते. (Pune Ex MLA Vinayak Nimhan passes away)

विनायक निम्हण (Vinayak Nimhan) हे पुण्यातील (Pune) शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघातून १५ वर्षे आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले होते. सन १९९९ ते २०१४ अशी १५ वर्षे त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले होते. आधीच्या दोन टर्म ते शिवसेनेच्या तिकीटावर निवडून गेले होते, तर नंतरची टर्म ते काँग्रेसच्या तिकीटावर निवडून विधानसभेवर गेले होते.

Ex MLA Vinayak Nimhan passes away
Mulayam Singh Yadav: सपा नेते मुलायम सिंह यादव यांचं निधन; वयाच्या ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

विनायक निम्हण यांना प्रकृती अस्वास्थ्यानंतर औंध जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली. निम्हण यांच्यावर आज रात्री पाषाण स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. (Tajya Batmya)

Ex MLA Vinayak Nimhan passes away
Mulayam Singh Yadav: सपा नेते मुलायम सिंह यादव यांचं निधन; वयाच्या ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात

विनायक निम्हण यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून झाली होती. नारायण राणे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर ते देखील नारायण राणेंसोबत पक्षातून बाहेर पडले होते. त्यानंतर ते नारायण राणेंसोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काही काळानंतर नारायण राणेंची साथ सोडली आणि पुन्हा शिवसेनेत परतले होते. ते पुण्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते होते, परंतु, सध्या ते पक्षात तितके सक्रिय नव्हते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com