
भूषण शिंदे, मुंबई
Ramdas Athawale News: केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आपल्या काव्यात्मक भाषणाच्या शैलीमुळे आणि शीघ्र कवितांमुळे प्रसिद्ध आहेत. आज, मुंबईत त्यांनी पुन्हा एकदा आपल्या खास शैलीत फटकेबाजी केली आहे. मी गेटवे ऑफ इंडियावर गो कोरोना गो ची गोषणा दिली आणि एकनाथ शिंदेंनी गो महाविकास आघाडी गो अशी घोषणा केली असं म्हणत आठवलेंनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच एकनाथ शिंदे हे प्लॅनिंग करण्यात हुशार आहेत असंही आठवले म्हणाले. मुंबईत, बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते. त्यांच्या भाषणामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. (Latest Marathi News)
यावेळी आठवले (Ramdas Athawale) म्हणाले की, कोरोनामध्ये अनेक लोक आपल्याला सोडून गेले आणि मी २० फेब्रुवारी २०२० ला गेटवे ऑफ इंडियाजवळ घोषणा केली होती, गो कोरोना गो (Go Corona Go). त्यानंतर एकनाथ शिंदेंनी घोषणा केली गो महाविकास आघाडी गो... ते सारखं म्हणतात खोके, त्यांचं बिघडलेलं आहे का डोके? काय खोक्याचा संबंध आहे तिकडे? तिकडे भूमिकेचा आणि विचारांचा संबंध आहे. (LIVE Marathi News)
एकनाथ शिंदे प्लॅनिंग करण्यात हुशार आहेत. ४० आमदार म्हणजे ५० आमदार. त्यांच्याकडे (शिवसेनेकडे) राहिले फक्त पंधराचं. आणि म्हणतात आमचं राज्य येणार, आमचं राज्य येणार. तुमचं राज्य कसं काय येणार आम्ही इथं असताना? आम्ही काय गोट्या खेळण्याचं काम करतो का इथं? अशा तूफान भाषणाने आठवलेंनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. (Tajya Batmya)
आठवले पुढे म्हणाले की, माझे उद्धव ठाकरे यांच्याशी अत्यंत चांगले संबंध होते, नंतर माझेही बिघडले आणि एकनाथ शिंदे यांचेही बिघडले. पक्ष चुकीच्या मार्गावर जातो म्हटल्यावर त्यांना (एकनाथ शिंदे) ते मंजूर नव्हतं. मला देखील ते मंजूर नव्हतं. पण एकनाथ शिंदे चांगलं प्लॅनिंग करतात. बुलंद आवाज ज्यांचा आहे ते सगळे तुमच्याकडे आले आणि ज्यांना आवाज नाही ते तिथे राहिले आहेत असा टोमणा आठवलेंनी उद्धव ठाकरे गटाला लगावला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात २०२४ ची मॅच आम्हीच जिंकणार आणि त्यात ४०० रन काढणार असा आत्मविश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. (Breaking Marathi News)
कोरोना की आ गई है महामारी
जाग गई है दुनिया की जनता सारी
परेशान रही गाँव - गाँव की नारी
मेरे उपर भी आ गई थी अॅडमीट होने की बारी
मोदीजी के आव्हान पर सभी देश ने बजाई थी ताली
फिर सरकार को क्यों दे रहे हो गाली
कोरोना की वो रोत बहुत थी काली
फिर हमारे सरकार को क्याें दे रहें हो गाली
कोरोना को मत डरोना, कोरोना से मत हारोना
कोरोना को जल्दी मारोना, कोरोनो को बर्बाद करोना
नरेंद्र मोदीजीने कोरोना काल मे काम किया था बहुत अच्छा
इसलिए खुश है गाँव - गाँव की माँ और बच्चा
नरेंद्र मोदीजी माणूस बहुतही है सच्चा
राजनीती मे वह नही है कच्चा
- रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री, भारत सरकार
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.