Sanjay Raut On Ajit Pawar: 'मुख्यमंत्र्यांची अस्वस्थता मी समजू शकतो, पण..'; अजित पवारांच्या चर्चांवर संजय राऊतांचे स्पष्ट मत

Ajit Pawar Latest News: अजित पवार यांना ४० आमदारांचा पाठिंबा असून ते लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
Sanjay Raut
Sanjay RautSaam tv

Mumbai News: महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) पुन्हा राजकीय भूकंप येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (NCP Lader Ajit Pawar) हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. अजित पवार यांना ४० आमदारांचा पाठिंबा असून ते लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

या चर्चावर आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली. 'अजित पवार कुठेही जाणार नाही. तसं काहीच होणार नाही. ते महाविकास आघाडीचे आधारस्तंभ आहेत.', असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

Sanjay Raut
Maharashtra Political Crisis: सर्वात मोठी बातमी! भाजपचे राज्यात ऑपरेशन कमळ; मविआचे ४० आमदार फुटणार

संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'अजित पवार भाजपमध्ये जाणार या बातम्यांमुळे राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या गटाच्या पोटात सर्वात जास्त गोळा आला असेल. त्यांची अस्वस्थता मी समजू शकतो. पण तसं काहीही होणार नाही. अजित पवार हे माहाविकास आघाडीचे आधारस्तंभ आहेत. ते प्रमुख नेते आहेत. त्यांचे राजकीय भवितव्य हे महाविकास आघाडीतूनच पुढे जाणार आहे.'

Sanjay Raut
Dhananjay Munde Not Reachable : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आहेत तरी कुठे? नॉट रिचेबल असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

अजित पवार हे कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट करत संजय राऊत यांनी सांगितले की, 'अजित पवारांविषयी या सर्व बातम्या आणि रेवड्या उठल्या जात आहेत. त्याचा महाविकास आघाडीच्या एकीवर आणि मजबुतीवर काहीच परिणाम होणार नाही.' तसंच, 'आज सकाळी आम्ही सर्वजण एकत्र बोललो आहोत. आम्ही सर्व माहिती घेतली. पण हे आकडे कुठून येतात हे माहिती नाही. एकाच वृत्तपत्राला हे आकडे कसे मिळतात माहिती नाही.', असे संजय राऊत यांनी सांगितले.

Sanjay Raut
Maharashtra Politics : डबल इंजिन सरकारला तिसरं इंजिन लागलं तर... भाजप आमदाराचं सूचक वक्तव्य

दरम्यान, लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने महाराष्ट्रात सर्वात मोठी खेळी खेळण्यास सुरुवात केली आहे. भाजप राज्यात ऑपरेशन कमळ राबवणार असून महाविकास आघाडीचे 40 आमदार फुटणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आमदारांचा मोठा गट फुटणार असल्याची शक्यता आहे. तसंच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे 40 आमदारांसह भाजपमध्ये जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com