Crime News : साडेतीन वर्षाच्या मुलास लाथा बुक्यांनी, वायरनं मारलं; मृत्यूप्रकरणी आईला अटक

या जबर मारहाणीत कार्तिक बेशुद्ध पडला.
dombivili crime news , crime news
dombivili crime news , crime newssaam tv

Dombivli : सावत्र आईने (mother) अमानुषपणे केलेल्या मारहाणीत कार्तिक जैस्वाल या साडेतीन वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आज सकाळी सावत्र आईला टिळकनगर पोलिसांनी (police) अटक (arrest) केली आहे. अंतिमादेवी संजय जैस्वाल (वय २८) असे संशियताचे नाव आहे. (Maharashtra News)

ही घटना पुर्वेकडील पाथर्ली, गायकवाडवाडी येथील सिताबाई निवास येथे गुरुवारी दुपारी घडली. अंतिमादेवी हिला पहिल्या पतीपासून दोन मुले आहेत तर कार्तिक आणि त्याचा सात वर्षाचा मोठा भाऊ अशी दोन सावत्र मुले आहेत. कार्तिकचे वडील संजय हे इलेक्ट्रिशियनची कामे करतात. अंतिमादेवी ही नेहमी सावत्र मुलांना मारहाण करायची. काल दुपारी तीनच्या सुमारास तीने साडेतीन वर्षाच्या कार्तिकला लाथा बुक्यांनी आणि वायरने बेदम अमानुषपणे मारहाण केली. (Tajya Batmya)

dombivili crime news , crime news
Navratri 2022 : तुळजापूरला जाण्यासाठी 'येथून' साेडली जात आहे मिनिटाला बस (पाहा व्हिडिओ)

या जबर मारहाणीत कार्तिक बेशुद्ध पडला. त्याला केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले गेले. परंतू कार्तिकची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. (dombivli crime news)

dombivili crime news , crime news
Versova: प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या नावाने बोगस फेसबुक अकाउंटवरून युवतींशी चॅटिंग करणाऱ्या इंजिनिअरला अटक

दरम्यान उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. मारहाणीत शरीराच्या अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. पोलीसांनी आज सकाळी कार्तिकला अमानुषपणे मारहाण करुन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अंतिमादेवी हिला अटक केली.

Edited By : Siddharth Latkar

dombivili crime news , crime news
School : ताेपर्यंत साेडणार नाही ! मुख्याध्यापकासह विस्तार अधिका-यास कोंडलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com