Police Bharati: हायटेक कॉपीनंतर आता उत्तेजीत करणाऱ्या औषधांचं सेवन?; पोलीस भरती प्रक्रियेतला धक्कादायक प्रकार उघडकीस

मैदानी चाचणीत पास होण्यासाठी दोन उमेदवारांकडे उत्तेजीत करणारी काही औषधे सापडली आहेत.
Police Bharati
Police BharatiSaam TV

माधव सावरगावे

सचिन कदम

Police Bharati: अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या पोलीस भरतीची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. सर्वत्र तरुणांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला आहे. अशात मैदानी चाचणीत पास होण्यासाठी दोन उमेदवारांकडे उत्तेजीत करणारी काही औषधे सापडली आहेत. मैदानी परिक्षेत पास होण्यासाठी त्यांनी याचे सेवन केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या धक्कादायक घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या दोन्ही तरुणांच्या रक्ताचे नमुने मुंबईच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी भरती प्रक्रियेत कोणताही गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नाही असे म्हटले आहे. श्रीगोंदा अहमदनगर येथील एक आणि शिरूर पुणे येथील एक असे दोन उमेवार राहत असलेल्या कॉटेजवर पोलिसांनी रविवारी छापा मारला. यावेळी त्यांना खोलीत दोन न्युरोकाइन्ड गोल्ड इंजेक्शन, नावाचे लेबल नसलेल्या औषधी द्रव्यांनी भरलेल्या काचेच्या तीन बंद बॉटल, पाच ओमेगा व्हीआयटी सीई टॅबलेट सापडले.

यासह त्या खोलीत तीन इंजेक्शन सिरींज सुईसह, एक डिस्पोव्हॅन कंपनीची हायपोडर्मिक सिरींज, एक लाल रंगाची कॅप्सुल, एक बीडी यू ४० इन्सुलिन आणि विवीध कंपन्यांच्या आणि आकाराच्या इंजेक्शन निडल अशा प्रकारचे साहित्य पोलिसांच्या हाती लागले. या दोन्ही संशयीत उमेदवारांची वैद्यकिय तपासणी करण्यात आली असून या प्रकरणी औषधांच्या तपासणी नंतर दोशी असलेल्या संबधीत उमेदवारांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली आहे.

Police Bharati
Police Uniform Allowance : पोलीस अधिकाऱ्यांसाठी खूशखबर! गणवेश भत्त्यात वाढ

हायटेक कॉपीच्या प्रकारांमुळे महाराष्ट्र पोलीस अलर्ट

पोलीस भरतीच्या मागच्या परीक्षेत हायटेक कॉपीचे प्रकार समोर आल्यानं आता सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत महाराष्ट्र पोलीस अलर्ट झाले आहेत. राज्यात पोलीस शिपाई, चालक, राज्य राखीव पोलीस दलातील शिपाई पदाच्या १८ हजार ३३१ जागांसाठीची भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी १८ लाख १२ हजार ५३८ युवकांनी अर्ज केला आहेत. २ जानेवारीपासून राज्यभरात मैदानी चाचणी घेतली जात आहे.

Police Bharati
Police Bharti : पोलीस भरतीमध्ये बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर ; पाहा व्हिडीओ

त्यानंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. मागील वेळच्या हायटेक कॉपीच्या प्रकारामुळे आता महाराष्ट्र पोलीस विभागही अलर्ट झाला आहे. लेखी परीक्षेची तारीख लवकरच जाहीर होणार असून राज्यभरात एकाचवेळी ही परीक्षा होणार आहे. मागील पोलिस भरतीच्या वेळी औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांतील युवकांनी हायटेक कॉपी करण्याचा प्रयत्न पुणे, नागपूर, आदी ठिकाणच्या लेखी परीक्षेच्या वेळी केला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com