Asim Sarode On SC Hearing: सुप्रीम कोर्ट काय निकाल देऊ शकतं? कायदेतज्ज्ञांनी व्यक्त केल्या या 6 शक्यता...

Supreme Court Verdict Latest News: राज्याच्या सत्तासंघर्षासह मुख्यमंत्री (Maharashtra CM) पदावर कोण विराजमान होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Asim Sarode On SC Hearing
Asim Sarode On SC HearingSaam Tv

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या राजकीयदृष्टीने (Maharashtra Political Crisis) आजचा दिवस हा खूपच महत्वाचा आहे. राज्याच्या सत्तासंघर्षासह मुख्यमंत्री (Maharashtra CM) पदावर कोण विराजमान होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज सुप्रीम कोर्ट (Supreme Court) देणार आहे. अनेक राजकीय जाणकारांनी या निकालाबाबत वेगवेगळ्या शक्यता व्यक्त केल्यात.

अशात आता कायदेतज्ज्ञ असीम सरोदे (legal experts Asim Sarode) यांनी देखील निकालाच्या अवघ्या काही तासांआधीच महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रीम कोर्ट काय निकाल देऊ शकतं, याबाबत त्यांनी 6 शक्यता व्यक्त केल्या आहेत. (Latest Marathi News)

Asim Sarode On SC Hearing
Chandrakant Khaire News: 'एकनाथ शिंदे जादूटोणा करतात, त्यांच्या तोंडात पांढरा खडा...' निकालाआधीचं चंद्रकांत खैरेंचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी सांगितले की, 'सुप्रीम कोर्ट वेगळा निर्णय देईल अस वाटतंय. पक्षांतर्गत बंदीसंदर्भात देशातील सगळ्यात वेगळा निर्णय येऊ शकतो. विधानसभा अध्यक्ष यांना निर्णय घेण्यासाठी पत्र पाठवले जाईल. त्यासाठी कोर्टाकडून काही वेळ दिला जाईल.'

राज्यपालांनी घेतलेल्या फ्लोअर टेस्टबाबत पण निर्णय येऊ शकतो. तो अधिकार कदाचित नरहरी झिरवळ यांच्याकडे येऊ शकतो. पक्षविरुद्ध कारवाई केल्यास सरळ सरळ दिसत आहे त्यामुळे यावरही कोर्ट निर्णय देऊ शकतो. सुप्रीम कोर्टच अपात्रतेचा निकाल देण्याची शक्यता आहे. 16 आमदारांची अपात्रता कोर्टच करेल. इतर पण आमदार मग अपात्र ठरू शकतात. हा निर्णय कोर्ट करेल.' असे मत असीम सरोदे यांनी व्यक्त केले आहे.

Asim Sarode On SC Hearing
Ulhas Bapat: उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात; घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी अतिमहत्वाच्या ५ मुद्द्यांवर वेधले लक्ष

दरम्यान, सुप्रीम कोर्टाचा निकाल जाहीर होण्यापूर्वी घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी 'उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात.' अशी शक्यता व्यक्त केली आहे. उल्हास बापट यांनी सांगितले की, 'हा खटला इतके दिवस चालू राहणे हेच मुळात चुकीचे आहे. आज निकाल लागत असेल तर आनंदाची गोष्ट आहे. 2/3 लोक एकावेळी बाहेर गेले आणि दुसऱ्या पक्षात विलीन झाले तर ते वाचतात. मात्र 16 जण एकाच वेळी बाहेर पडले पण ते 2/3 होत नाहीत त्यामुळे ते अपात्र ठरतात.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com