Haryana Accident News: क्रुजर अन् दुचाकी ट्रकखाली चिरडली; भीषण अपघातात एकाच वेळी ५ जणांचा मृत्यू

या अपघातात एकाचवेळी ५ जणांनी मृत्यू झाला आहे.
Haryana Accident News
Haryana Accident NewsSaam TV

Accident News: हरियाणा येथून अपघाताची एक मोठी घटना समोर आली आहे. राष्ट्रीय महामार्ग 9 वरील हांसीजवळील रामपुरा गावाजवळ सकाळी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचवेळी ५ जणांचा मृत्यू झालाय. (Latets Accident News)

बुधवारी सकाळी ही घटना घडली, यावेळी हॉटेल सांझाजवळ उभ्या असलेल्या ट्रकखाली क्रूझर आणि बाईकची धडक झाली. धडकेत क्रूझर आणि बाईकस्वारांचा मृत्यू झालाय.

Haryana Accident News
Dharavi Crime News: क्रूरतेचा कळस! २० वर्षीय तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; धक्कादायक घटनेनं धारावी हादरली

अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्ती एकाच कंपनीत काम करत होते. सकाळी कामावर जाण्यासाठी क्रूजर त्यांना घेण्यासाठी आली. यावेळी प्रत्येकाला आपल्या स्टॉपवरून पिक केल्यानंतर चारचाकी गाडी ऑफिसच्या दिशेने निघाली. मात्र वाटेतच काळाने त्यांच्यावर झडप घातली.

घटना घडली त्यावेळी या परिसरत पावसातच्या सरी बरसत होत्या. तसेच वाहनांचा वेग जास्त असल्याने अपघात (Accident) घडला आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ येथे धाव घेतली. अपघातामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत वाहतूक सुरळीत केली आहे.

Haryana Accident News
Pune Accidnet : पुण्यात चांदणी चौक परिसरात भीषण अपघात, शिवशाही बसची ६-७ वाहनांना जोरदार धडक

एकाच कुटुंबातील चौघे ठार

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) लखनऊमध्ये देखील अपघाताची अशीच एक मोठी घटना घडली आहे. या घटनेत कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

ही घटना लखनऊच्या विकास नगरमध्ये मंगळवारी रात्री उशिरा घडली. अपघातानंतर भरधाव कारने दुचाकीला 100 मीटरपर्यंत फटफटत नेले. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताचा तपास लखनऊ पोलिसांकडून (Lucknow Police) तपास सुरु आहे.

लखनऊच्या विकास नगर येथील गुलचीन मंदिराजवळ हा अपघात झाला. भरधाव स्कॉर्पिओ कारने दुचाकीला धडक दिली. या दुचाकीवरुन पती-पत्नी आणि दोन लहान मुलं प्रवास करत होते. धडक दिल्यानंतर कारने दुचाकीला 100 मीटरपर्यंत फटफटत नेले. त्यानंतर या कारने झाडाला धडक दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com