Crime Video : अग्निपरीक्षा ! माझे अनैतिक संबंध नाहीत; खरं सांगूनही दिली भयंकर शिक्षा

ल काळजावर दगड ठेवून मरणयातना सहन करत ती सळी बाहेर काढली.
Crime Video
Crime VideoSaam TV

Telangana News: जग विज्ञानाच्या जोरावर पुढे चालले असताना अजूनही काही व्यक्ती भूत, जादूटोणा, अग्निपरीक्षा अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात. तेलंगणा येथून एक काळीज पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे. यामध्ये एका तरुणाला आपल्या वहिनीशी असलेले संबंध सिद्ध करण्यासाठी विस्तवावरून चालण्यास सांगितलं आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील रेकॉर्ड करण्यात आलाय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय. (Latest Telangana News)

मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणामधील बंजारूपल्ली या गावात ही घटना घडली आहे. या गावात एका कुटुंबातील भावा-भावांची भांडणं सुरू झाली. मोठ्या भावाने पत्नी आणि बारका भाऊ यांतील संबंधांवर संशय व्यक्त केला. त्यामुळे याचा न्यायनिवाडा करण्यासाठी गावात पंचायत बोलावण्यात आली. त्यावेळी जमलेल्या सर्वांनी बारक्या भावाला तो खरं बोलत आहे की खोटं हे सिद्ध करण्यास सांगितले.

Crime Video
Crime News : तो म्हणे ‘करो प्यार’, तिचा होता नकार ! सहा महिने तिच्यावर झाला अत्याचार, अखेर...

वहिनीशी माझे कोणतेही अनैतिक संबंध नाहीत हे तो जिवाच्या आकांताने सर्वांना सांगत होता. मात्र कोणीही त्याचं ऐकत नव्हतं त्यामुळे शेवटी आपलं म्हणणं खरं असल्याचं लोकांना पटवून देण्यासाठी त्याने अग्निपरीक्षा दिली. यावेळी संपूर्ण गाव जमला होता. मैदानात जमिनीवर विस्तव टाकला होता. त्यात एक लोखंडी सळी ठेवण्यात आली. ही सळी तापून अगदी लाल झाली होती.

Crime Video
Mira Road Crime News : हजारो सीसीटीव्ही कसून तपासले आणि उलगडली जबरी चोरी

बारक्या भावाला तो खरं बोलत आहे हे सांगण्यासाठी ती सळी बाहेर काढायला सांगितले. त्याने देखील काळजावर दगड ठेवून मरणयातना सहन करत ती सळी बाहेर काढली. नंतर त्याला त्यावरून चालायला सांगितले. यावेळी तो अनवाणी पायांनी चालला. घटनेचा व्हिडिओ पाहून सर्वजण हळहळ आणि संताप व्यक्त करत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com