Awadhesh Rai Case: 32 वर्षांनी मिळाला अवधेश राय हत्येप्रकरणाला न्याय, गँगस्टर मुख्तार अन्सारीला जन्मठेपेची शिक्षा

Mukhtar Ansari Life Imprisonment: आयपीसीच्या कलम 302 अंतर्गत मुख्तार अन्सारीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Mukhtar Ansari Life Imprisonment
Mukhtar Ansari Life ImprisonmentSaam Tv

Varanasi News: काँग्रेस नेता (Congress Leader) अवधेश राय हत्याकांड प्रकरणाला (Awadhesh Rai Case) अखेर 32 वर्षांनंतर न्याय मिळाला आहे. याप्रकरणी वाराणसीच्या एमपी-एमएलए कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने गँगस्टर मुख्तार अन्सारी आणि इतरांना या प्रकरणामध्ये दोषी ठरवले. मुख्तार अन्सारीला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा आणि एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. आयपीसीच्या कलम 302 अंतर्गत मुख्तार अन्सारीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Mukhtar Ansari Life Imprisonment
Maharashtra Weather Update: राज्यात पुढचे 2 ते 3 दिवस विजांच्या कडकडाटासह पडणार मुसळधार पाऊस, 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी

गँगस्टर मुख्तार अन्सारी याआधीच एका प्रकरणात 10 वर्षांची शिक्षा भोगत होता. त्याला आता अवधेश राय हत्या प्रकरणातही कोर्टाने दोषी ठरवले आहे. या प्रकरणी सोमवारी कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 32 वर्षांपूर्वी 3 ऑगस्ट 1991 रोजी वाराणसीतील काँग्रेस नेते अवधेश राय यांची हत्या करण्यात आली होती.

तब्बल 32 वर्षांनंतर अवधेश राय प्रकरणाला न्याय मिळाला आणि दोषींना शिक्षा मिळाली आहे. अवधेश हत्या प्रकरणात गँगस्टर मुख्तार अन्सारी टोळीने मूळ प्रकरणाची डायरीही कोर्टातून गायब केली होती. मागच्या वर्षी जून 2022 मध्ये जेव्हा हा प्रकरा उघड झाला तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसला होता.

3 ऑगस्ट 1991 रोजी काँग्रेस नेता अवधेश राय यांची लाहुराबीर भागातील त्यांच्या निवासस्थानाच्या गेटवर भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. अवधेश राय यांचा भाऊ अजय राय यांनी या हत्येप्रकरणी माजी आमदार मुख्तार अन्सारी, अब्दुल कलाम, भीम सिंह, कमलेश सिंह आणि राकेश न्यायमूर्ती यांच्याविरोधात चेतगंज पोलीस ठाण्यात नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. हे प्रकरण खासदार-आमदार विशेष न्यायाधीश अवनीश गौतम यांच्या न्यायालयात प्रलंबित होते. मुख्तार अन्सारी सध्या बांदा कारागृहात आहे. मुख्तार अन्सारीविरोधात स्थानिक न्यायालयात आणि राकेश न्यायमूर्तीविरुद्ध अलाहाबाद जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

Mukhtar Ansari Life Imprisonment
Odisha train Accident : काळजाच्या तुकड्यासाठी अ‍ॅम्बुलन्ससह 230 किमी अंतर कापून बालासोर गाठलं; मुलाला शवागारात पाहिलं अन्...

या खटल्याच्या सुनावणीदरम्यान माजी आमदार अब्दुल कलाम आणि कमलेश सिंह यांचा मृत्यू झाला. अवधेश राय हत्या प्रकरणाची सुनावणी सुरुवातीला बनारसच्या एडीजे कोर्टात सुरू होती. 23 नोव्हेंबर 2007 रोजी या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना कोर्टापासून काही अंतरावरच बॉम्बस्फोट झाला होता. सुरक्षेचा धोका असल्याचे कारण देत राकेश न्यायमूर्तींनी हायकोर्टातचा आसरा घेतला आणि सुनावणी बराच काळ स्थगित झाली.

या घटनेनंतर हे प्रकरण प्रयागराज जिल्हा न्यायालयात वर्ग करण्यात आले. वाराणसीचे एमपी एमएलए कोर्ट स्थापन झाल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी येथे सुरू झाली. राकेश न्यायमूर्तीची फाईल अद्याप प्रयागराजमध्ये प्रलंबित आहे. गेल्या वर्षभरात मुख्तार अन्सारीला चार प्रकरणांमध्ये शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुख्तारविरुद्धचे हे पहिलेच हत्या प्रकरण आहे ज्याचा खटला आहे, ज्यात हा निकाल आला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com