BARC Recruitment 2023: सुवर्णसंधी! BARC मध्ये 4374 पदांसाठी बंपर भरती, 56 हजारांपर्यंत मिळेल पगार

Latest News: या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 24 एप्रिल 2023 पासून सुरु झाली आहे.
BARC Recruitment 2023
BARC Recruitment 2023SAAM TV

Mumbai News: सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. बीएआरसीमध्ये (BARC) त्यांना नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. भाभा अणु संशोधन केंद्राने 4000 पेक्षा अधिक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते बीएआरसीची अधिकृत वेबसाइट barc.gov.in ला भेट देऊन अर्ज करु शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 24 एप्रिल 2023 पासून सुरु झाली आहे.

BARC Recruitment 2023
Samruddhi Mahamarg Accident: कुत्र्याला वाचवण्याच्या नादात झाला भयंकर अपघात; 2 जण जखमी

भाभा अणु संशोधन केंद्राने जारी केलेल्या अधुसूचनेनुसार, स्टायपेंडरी ट्रेनी, विविध विभागांमध्ये तांत्रिक अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक (अन्न तंत्रज्ञान / गृहविज्ञान / पोषण) आणि तंत्रज्ज्ञ (बॉयलर अटेंडंट) या पदांच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 4374 पदं भरली जाणार आहेत. यापैकी 212 पदं थेट भरतीने आणि 4162 पदे प्रशिक्षण योजनेसाठी (स्टायपेंडरी ट्रेनी) आहेत. प्रशिक्षण योजनेतही 1216 पदं श्रेणी I आणि 2946 पदं श्रेणी II ची असणार आहेत.

BARC Recruitment 2023: महत्वाच्या तारखा -

अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु - 24 एप्रिल 2023

अर्ज करण्याची अंतिम तारीख - 22 मे 2023

BARC Recruitment 2023
Nagpur News: हिंगणा MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, 4 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

BARC Recruitment 2023: शैक्षणिक पात्रता -

- तांत्रिक अधिकारी/सी - संबंधित क्षेत्रात M.Sc/ BE/B.Tech.

- वैज्ञानिक सहाय्यक/ बी - B.Sc. (फूड टेक्नॉलॉजी/ गृह विज्ञान/ पोषण. तंत्रज्ञ/बी - एसएससी + द्वितीय श्रेणी बॉयलर अटेंडंटचे प्रमाणपत्र.

- तंत्रज्ज्ञ/बी - SSC + द्वितीय श्रेणी बॉयलर अटेंडंटचे प्रमाणपत्र.

- स्टायपेंडरी ट्रेनी कॅट I - B.Sc./ डिप्लोमा/ संबंधित क्षेत्रात.

- स्टायपेंडरी ट्रेनी कॅट II - SSC (विज्ञान आणि गणितासह) संबंधित ट्रेडमध्ये एकूण प्लस ट्रेड प्रमाणपत्र किमान 60 टक्के गुणांसह किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितासह HSC किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्रासह HSC किंवा एकूण 60% गुणांसह HSC आणि बायोलॉजीमध्ये किमान 60 टक्के गुणांसह एकूण किंवा HSC (विज्ञान) मध्ये किमान 60 टक्के गुणांसह एकूण 2 वर्षांचा डिप्लोमा डेंटल कौन्सिल ऑफ इंडियाद्वारे मान्यताप्राप्त आहे.

BARC Recruitment 2023
Sharad Pawar News: 'वेगळा अर्थ काढू नका'; महाविकास आघाडीवर केलेल्या वक्तव्यावर शरद पवारांचं स्पष्टीकरण

BARC Recruitment 2023: अर्ज फी -

तांत्रिक अधिकारी/सी- 500 रुपये

वैज्ञानिक सहाय्यक/बी- 150 रुपये

तंत्रज्ञ/बी- 100 रुपये

स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी I)– 150 रुपये

स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी II)- 100 रुपये

SC/ST, PWBD, माजी सैनिक आणि महिला - कोणतेही अर्ज शुल्क नाही

BARC Recruitment 2023
Wrestlers Protest : महिला कुस्तीपटूंची सुप्रीम कोर्टात धाव, WFI अध्यक्षांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

BARC Recruitment 2023: पगार -

तांत्रिक अधिकारी पदांसाठी - 56100 रुपये प्रतिमाह

वैज्ञानिक सहाय्यक पदांसाठी - 35,400 रुपये प्रतिमाह

तंत्रज्ञसाठी - 21700 रुपये प्रतिमाह

स्टेप ट्रेनी श्रेणी I पदांसाठी - 24,000 रुपये प्रतिमाह

स्टेप ट्रेनी श्रेणी II पदांसाठी - 20,000 रुपये प्रतिमाह

BARC Recruitment 2023: निवड प्रक्रिया -

या रिक्त जागांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज केल्यास मुलाखतीपूर्वी स्क्रीनिंग चाचणी घेतली जाऊ शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com