Chandrashekhar Azad News: भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळीबार; रुग्णालयात उपचार सुरू

Chandrashekhar Azad News: भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्या ताफ्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. या प्राणघातक हल्ल्यात चंद्रशेखर जखमी झाले असून त्यांना देवबंद येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Chandrashekhar Azad Firing News:
Chandrashekhar Azad Firing News:Saam TV

Chandrashekhar Azad Firing News: उत्तरप्रदेशातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्या ताफ्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. या प्राणघातक हल्ल्यात चंद्रशेखर जखमी झाले असून त्यांना देवबंद येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गोळीबारानंतर हल्लेखोर पसार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे.

Chandrashekhar Azad Firing News:
Uniform Civil Code News: समान नागरी कायदा लवकरच लागू होणार? मोदी सरकारला मिळालं बड्या नेत्याचं समर्थन

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद हे सध्या उत्तरप्रदेश (Uttar Pradesh) दौऱ्यावर आहेत. आज सायंकाळच्या सुमारास ते त्यांच्या फॉर्च्युनर कारमधून देवबंदकडे जात होते. त्यावेळी अचानक अज्ञात हल्लेखोर आले. त्यांनी चंद्रशेखर आझाद यांच्या कारवर गोळीबार सुरू केला.

या गोळीबारात चंद्रशेखर आझाद कंबरेला एक गोळी स्पर्श करून गेली. त्यामुळे ते जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.

गोळीबारात त्यांच्या गाडीच्या काचाही फुटल्या आहेत. गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलिसांनी नाकाबंदी करून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. यासोबतच आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजही तपासले जात आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर हरियाणा क्रमांकाच्या कारमध्ये आले होते. त्यांनी चंद्रशेखर आझाद यांच्या कारसमोर गाडी लावली. काही कळण्याच्या आतच हल्लेखोरांनी गोळीबार सुरू केला. हल्लेखोरांनी यावेळी एकूण चार राऊंड फायर केले. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com