Mann Ki Baat 100th Episode : 'मन की बात' खास बनवण्यासाठी जय्यत तयारी! 4 लाख ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन

PM Modi 'Mann Ki Baat' : उद्या राज्यभरात आणि मुंबईत अनेक ठिकाणी मन कि बात कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे.
PM to Address 'Mann Ki Baat' 100th Episode
PM to Address 'Mann Ki Baat' 100th Episodesaam tv

PM to Address 'Mann Ki Baat' 100th Episode : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन कि बात कार्यक्रमाचा उद्या 100 वा कार्यक्रम असणार आहे. हा कार्यक्रम अभूतपूर्व बनवण्यााठी भारतीय जनता पक्षाकडून सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. उद्या राज्यभरात आणि मुंबईत अनेक ठिकाणी मन कि बात कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे.

मुंबईत 5000 पेक्षा अधिक ठिकाणी 'मन कि बात'चे कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. या सर्व ठिकाणी हजारो लोक हा कार्यक्रम ऐकणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान तीन कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असून शहरांतील अनेक सोसयट्यांमध्येदेखील हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.

PM to Address 'Mann Ki Baat' 100th Episode
Market Committee Election Results: मतदारांचा कौल कोणाला? एका क्लिकवर पाहा राज्यातील सर्व बाजार समितींचे निकाल

देशभरातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सरासरी 100 ठिकाणी हा कार्यक्रम ऐकण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी भाजपकडून करण्यात येत आहे. जेणेकरून लोकांना ते ऐकता येईल. भाजपच्या सूत्रांनी सांगितले की मोदींचे भाषण ऐकण्यासाठी पक्षाकडून विदेशासह सुमारे 4 लाख ठिकाणी व्यवस्था करेल. पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा हे ऐतिहासिक बनवण्यासाठी संपूर्ण कवायतीचे निरीक्षण करत आहेत असे सूत्रांनी सांगितले आहे.

'मन की बात' या कार्यक्रमाचे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारण होते. या लाईव्ह प्रसारणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या मनातील विविध विषयांवर बोलतात. हा कार्यक्रम 2014 मध्ये सुरू झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आले तेव्हापासून हा कार्यक्रम सुरु आहे. या कार्यक्रमाचा 100 वा भाग 30 एप्रिल रोजी प्रसारित होणार आहे. त्यामुळे हा 100 वा भाग खास बनवण्यासाठी भाजपकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे.

PM to Address 'Mann Ki Baat' 100th Episode
Building collapsed in Bhiwandi: भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली! ४० ते ५० जण दबल्याची शक्यता, बचाव कार्य सुरू

प्रतिष्ठित नागरिकांसाठी खास व्यवस्था

पक्षाच्या परदेशी युनिट्स आणि अनेक गैर-राजकीय संघटनांना देखील रेडिओ प्रसारणाची पोहोच जास्तीत जास्त वाढवण्यास सांगितले आहे. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप किंवा त्यांच्या मित्रपक्षांच्या सर्व प्रतिष्ठित नागरिकांसाठी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी कार्यक्रम ऐकण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

भाजपचे खासदार, आमदार लक्ष ठेवणार आहेत

राजभवन येथे आयोजित कार्यक्रमात सर्व राज्यांतील पद्म पुरस्कार विजेत्यांना सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे. भाजपचे खासदार आणि आमदार या आयोजनावर लक्ष ठेवण्यासाठी आपापल्या मतदारसंघात राहतील. तर जेपी नड्डा आणि पक्षाचे इतर वरिष्ठ नेते यासंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नजर ठेवणार आहेत. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com