VIDEO : भर मंडपात नवरदेव-नवरीमध्ये तुफान हाणामारी; कारण पण लय भन्नाट

व्हिडिओत भर मंडपात नवरदेव-नवरी तुफान हाणामारी करताना दिसून येत आहेत.
Bride Beaten To Groom In Wedding
Bride Beaten To Groom In Weddingsaam tv news

मुंबई : लग्न (Marriage) म्हटलं की गडबड गोंधळ आलाच. कधी लग्नात मानपान देण्यावरून वाद विवाद होतात. तर कधी डीजेच्या तालावर नाचणाऱ्या नवरदेवाच्या मित्रांमुळे लग्नात गोंधळ निर्माण होतो. सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. काही मजेशीर असतात तर काही थक्क करणारे असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत भर मंडपात नवरदेव-नवरी तुफान हाणामारी करताना दिसून येत आहेत. (Bride Beaten To Groom In Wedding Ceremony Viral Video)

Bride Beaten To Groom In Wedding
VIDEO : दानवे साहेब छत्रीत, विद्यार्थी मात्र पावसात; नाशकात सामूहिक राष्ट्रगायनाचा कार्यक्रम

सोशल मीडियावर व्हायरल होणारा या व्हिडिओत नवरदेव नवरी मंडपात बसलेले दिसत आहे. पंडितजी काहीतरी मंत्र म्हणताहेत. अचानक नवरदेव असं कृत्य करतो की, नवरीचा पारा चढतो आणि दोघांमध्ये भर मंडपात तुफान हाणामारी होते. हा व्हिडिओ खूप मजेशीर असून लग्नात असंही काही होऊ शकतं याची कुणी कल्पनाही करू शकत नाही.

व्हिडिओ जर बारकाईने बघितला तर, नवरदेव नवरी हे दोघेही मंडपात बसलेले दिसत आहे. त्यांच्यासोबत इतर मंडळी तसेच पंडितजी देखील तिथे हजर आहे. अचानक नवरेदव नवरीच्या गालावर हात लावतो, हे नवरीला आवडत नाही आणि तिचा राग अनावर होतो.

नवरी आधीपासूनच रागात असू शकते किंवा तिची लग्न न करण्याची इच्छा नसू शकते त्यामुळे ती अशी वागली असावी, अशी शंका आहे. पण तीने ज्याप्रमाणे नवरदेवाला चोप दिला तो खरंच अत्यंत अचंबित करणारा आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून आतापर्यंत व्हिडिओ ३ मिलियन पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओवर नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com