Chandrayaan 3 Updates: चांद्रयान ३ दक्षिण ध्रुवावर उतरल्यानंतर सर्वप्रथम काय करणार? इस्रोचा प्लान काय?

Chandrayaan-3 Latest Updates: चंद्रावर उतरल्यानंतर हे यान नेमकं काय करणार, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. याबाबत टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना इस्रोचे चेअरमन एस सोमनाथ यांनी माहिती दिली आहे.
chandrayaan 3 Latest Updates What will Vikram lander do after landing on the moon
chandrayaan 3 Latest Updates What will Vikram lander do after landing on the moonSaam TV

Chandrayaan-3 Latest Updates: चांद्रयान-३ या भारताच्या अंतराळ मोहिमेची आता सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. रशियाने चंद्रावर पाठवलेलं लुना २५ यान हे लँडिंग होण्याआधीच क्रॅश झालं. त्यामुळे आता भारताने पाठवलेल्या चांद्रयान-३ चे नेमके काय होणार याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून आहे. चांद्रयान-३ ही मोहिम आता अंतिम टप्प्यात आली आहे.

येत्या बुधवारी म्हणजेच उद्या (२३ ऑगस्ट) चांद्रयान-३ सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर लँडिंग करणार आहे. दरम्यान, चंद्रावर उतरल्यानंतर हे यान नेमकं काय करणार, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. याबाबत टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना इस्रोचे चेअरमन एस सोमनाथ यांनी माहिती दिली आहे.

chandrayaan 3 Latest Updates What will Vikram lander do after landing on the moon
Surgical Strike In Balakot: बालाकोटमध्ये कोणतंही सर्जिकल स्ट्राइक झालं नाही; फक्त दहशतवाद्यांना पळवून लावलं - संरक्षण मंत्रालय

चंद्रावर लँड केल्यानंतर चांद्रयान-३ काय करणार?

चांद्रयान-३ चंद्रावर उतरल्यावर विक्रम लँडरचा एक बाजूचा पॅनेल उघडेल. त्यानंतर प्रज्ञान रोव्हरसाठी एक रॅम्प तयार करेल. यानंतर भारताचा तिरंगा आणि चाकांवर नक्षीदार इस्रोचा लोगो असलेले सहा चाकांचे प्रज्ञान लँडरच्या पोटातून चंद्राच्या पृष्ठभागावर ४ तासांनंतर खाली उतरेल.

साधारणत: १ सेमी प्रति सेकंदाच्या वेगाने प्रज्ञान रोव्हर पुढे जाईल आणि चंद्राचा परिसर स्कॅन करण्यासाठी नेव्हिगेशन कॅमेऱ्यांचा वापर करेल. पुढे जात असताना रोव्हर चंद्रावरील रेगोलिथ (माती) वर तिरंगा आणि इस्रोच्या लोगोचे ठसे सोडेल. इतकंच नाही तर, चंद्रावर भारताची निशाणी देखील सोडणार आहे.

चांद्रयान-३ मुळे भारताला होणार मोठा फायदा

चंद्राच्या पृष्ठभागाशी संबंधित डेटा प्रदान करण्यासाठी रोव्हरमध्ये पेलोडसह कॉन्फिगर केलेली उपकरणे आहेत. ते चंद्राच्या वातावरणातील मूलभूत रचनेचा डेटा गोळा करण्यास मदत करतील. त्याचबरोबर लँडरला डेटा पाठवेल. तीन पेलोडसह, विक्रम लँडर पृष्ठभागाच्या जवळील प्लाझ्मा (आयन आणि इलेक्ट्रॉन) घनता मोजणार आहे.

chandrayaan 3 Latest Updates What will Vikram lander do after landing on the moon
Big Decision for Onion Farmers : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा; २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचा निर्णय

चांद्रयानला चंद्राचा अभ्यास करण्यासाठी किती वेळ लागणार?

सौरऊर्जेवर चालणाऱ्या लँडर आणि रोव्हरला चंद्राच्या परिसराचा अभ्यास करण्यासाठी सुमारे दोन आठवडे इतका कालावधी लागणार आहेत. यादरम्यान, रोव्हर केवळ लँडरशी संवाद साधू शकणार आहे, रोव्हरकडून सिग्नल मिळाल्यानंतर लँडर त्याची माहिती इस्रोला पोहचवणार आहे.

यात जर हे यान यशस्वी झाले तर इस्रो नासालाही मागे टाकेल. खरं तर, २००८ मध्ये जेव्हा चांद्रयान १ ने डेटा पाठवायला सुरुवात केली. तेव्हा नासाने २४ सप्टेंबर २००९ रोजी चंद्रयान १ च्या डेटाच्या आधारे चंद्राच्या दक्षिणेकडील भागात बर्फ असल्याचे पुरावे असल्याचे घोषित केले होते.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com