Petrol Diesel Price: कुठं स्वस्त, तर कुठं महागलं इंधन, झटपट तपासा आजचा इंधनाचा भाव

Petrol Diesel Price News : जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर
Petrol Diesel Prices
Petrol Diesel PricesSaam Tv

Petrol Diesel Price:  आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या किमती वाढताना दिसत आहेत. त्या पार्श्वभूमीवर देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी ६ वाजता इंधनाच्या किमती सुधारल्या जातात.(Latest Marathi News)

Petrol Diesel Prices
Video: केदारनाथ मंदिर आजपासून भक्तांसाठी खुले, हर हर महादेवाच्या जयघोषात उघडले दरवाजे, पाहा व्हिडिओ

हिमाचलमध्ये  पेट्रोल  (Petrol) 29 पैशांनी, पंजाबमध्ये 24 पैशांनी आणि जम्मू-काश्मीरमध्ये 62 पैशांनी महागलं आहे. या ठिकाणी डिझेल अनुक्रमे 26 पैसे, 23 पैसे आणि 50 पैशांनी महागले आहे. त्याचवेळी उत्तर प्रदेशात पेट्रोल-डिझेल 25 पैशांनी स्वस्त झाले आहे. पश्चिम बंगालमध्ये पेट्रोल 44 पैशांनी तर  डिझेल (Diesel) 41 पैशांनी स्वस्त झालं आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.73 रुपये आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर

– कोलकाता में पेट्रोल 106.03 रुपये और डीजल 92.76 रुपये प्रति लीटर

Petrol Diesel Prices
Pune Accident News: पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; तेलंगणाच्या दिशेने जाणारी खासगी बस उलटली, वाहतूक ठप्प

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com