
Churu Road Accident: राजस्थानमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. गुरूवारी (७, सप्टेंबर) सायंकाळी सरदाशहर जवळच्या मेगा हायवेजवळ ट्रक आणि बोलेरो कारमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात एकाच कुटूंबातील पाच जणांचा मृत्यू झाला तर १८ जण गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजस्थान (Rajasthan) सरदाशहर जवळच्या मेगा हायवेजवळ ट्रक आणि बोलेरोमध्ये भीषण अपघात झाला. भानीपुरा पोलीस ठाण्यांतर्गत मेगा-हायवेवर सदसर ते सावर या गावाच्या हद्दीत बोलेरो गाडीला समोरुन येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की गाडीतील पाच जणांचा मृत्यू झाला.
मृतांमध्ये तीन महिला, एक पुरुष आणि एका चिमुकल्याचा समावेश आहे तर १८ जण अपघातात जखमी झाले आहेत. धडक इतकी भयंकर होती की गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक तसेच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झालेल्या गाडीत एकूण २३ जण प्रवास करत होते. हे सर्वजण देवदर्शनाहून परतत असताना ही दुर्दैवी घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली होती. भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. (Latest Marathi News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.