UP Crime News
UP Crime NewsSaam tv

UP Crime News: धक्कादायक! तान्हुल्याला हे जग पाहता आलंच नाही; युपीत ६ महिन्यांच्या गरोदर महिलेची हत्या

Pregnant Woman Killed: महिलेला फसवून तिच्याशी लग्न केले आणि ती गरोदर असताना तिची हत्या केली आहे.

Latest UP News: उत्तर प्रदेशच्या शाहजहांपुर येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथे 'द केरला स्टोरी' या चित्रपटाप्रमाणे दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत एका महिलेच्या हत्ये प्रकरणी दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. यातील एकाने महिलेला फसवून तिच्याशी लग्न केले आणि ती गरोदर असताना तिची हत्या केली आहे. सदर घटनेनं संपूर्ण शहरात एकच खळबळ उडालीये. (Latets Marathi News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नवोद असं मुख्य आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याच्यासह अन्य दोघांना अटक केली आहे. आरोपींविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी काही सामाजिक संघटनांनी केली आहे.

UP Crime News
Raigarh Crime News: क्रूरतेचा कळस! चोर चोर म्हणून चिडवल्याचा राग; निर्दयी बहिणीने भावालाच संपवले

सदर घटना ही लोदीपुर ठाणे क्षेत्रातील आहे. सीमा असे मृत महिलेचे नाव आहे. ही महिला लखीपूर जिल्ह्यातील पलिया येथील रहिवासी होती. आरोपीने महिलेला आपल्या जाळ्यात खेचले. तिला तिच्या सुरक्षीततेची खात्री पटवून दिली. नंतर तिच्याशी लग्न करून तिचे नाव सिद्दीकी असे ठेवले.

६ महिन्याच्या गर्भवतीची हत्या

रविवारी आरोपी महिलेला मेडीकल कॉलेजमधून बाहेर घेऊन जात होता. यावेळी ती कोणतीही हालचाल करत नव्हती. डॉक्टरांच्या हे लक्षात येताच त्यांनी महिलेला तपासले असता मृत घोषीत केले. यावेळी शव बाहेर घेऊन जाण्यासाठी आरोपीने जबरदस्ती केली. या घटनेची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

UP Crime News
Pune Crime News: पोलिस हवालदाराचा महिलेवर अत्‍याचार; कुटुंबीयांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत धक्‍कादायक कृत्‍य

सदर महिला ही ६ महिन्यांची गरोदर (pregnant) होती. तिच्या कुटुंबियांनी असं म्हटलं आहे की, आरोपीने जबरदस्ती तिच्याशी विवाह केला. त्यानंतर तिची संपूर्ण ओळख बदलून टाकली. आता ती गरोदर असताना त्यांनी तिला विष देत तिची हत्या केली. महिलेच्या कुटुंबावर यामुळे दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com